पेठच्या युवकाचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: May 15, 2016 22:50 IST2016-05-15T22:12:58+5:302016-05-15T22:50:17+5:30

महिंन्याभरापूर्र्वीच झाला होता विवाह

Peth's teenage accidental death | पेठच्या युवकाचा अपघाती मृत्यू

पेठच्या युवकाचा अपघाती मृत्यू

 पेठ : सुखी संसाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सहचारिणी बरोबरच्या आयुष्याला सुरुवात केली असतानाच लग्नाला एक महिन्याचा कालावधी लोटला असतानाच पेठच्या युवकाला मृत्यूला सामोरे जावे लागल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे़
पेठ येथील चंद्रकांत वायडे यांचा मुलगा धर्मराज वायडे याचा दिनांक १७ एप्रिल रोजी पेठ येथे शुभविवाह झाला़ लग्नाचे सोपस्कर पार पडल्यानंतर आपल्या व्यवसायासाठी बाहेर पडलेला धर्मराज शनिवारी रात्री सुतारपाडा गुजरात येथून माल घेऊन रात्री साडेबाराच्या सुमारास आपल्या ओमनी कारने पेठकडे येत असताना वांगणीजवळ गाडीचे इंधन संपल्याने रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून इंधन भरत असताना गुजरातकडून येणाऱ्या वाहनाने वायडे यांच्या उभ्या कारला धडक दिली़ यामध्ये गाडी जवळच उभे असलेल्या धर्मराज वायडे यास जबर मार लागल्याने नागरिकांनी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले़ (वार्ताहर)

Web Title: Peth's teenage accidental death