पवार स्कूलच्या मुलींचा फुटबॉल संघ राज्यपातळीवर

By Admin | Updated: September 6, 2016 22:13 IST2016-09-06T22:13:03+5:302016-09-06T22:13:19+5:30

पवार स्कूलच्या मुलींचा फुटबॉल संघ राज्यपातळीवर

Pawar's school girls' football team at the state level | पवार स्कूलच्या मुलींचा फुटबॉल संघ राज्यपातळीवर

पवार स्कूलच्या मुलींचा फुटबॉल संघ राज्यपातळीवर

कळवण : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्यातर्फे नाशिक येथे घेण्यात आलेल्या सुब्रतो मुखर्जी विभागीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत कळवण येथील शरद पवार पब्लिक स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने विभागात वर्चस्व राखत विजय संपादन
केला.
उपांत्य सामन्यात मालेगाव संघाचा ५-० असा पराभव करून अंतिम सामन्यात विद्या प्रबोधिनी, नाशिक संघाचा ४-० गोलने धुव्वा घडवित विजयश्री प्राप्त केली. या स्पर्धेत माधुरी आहेर, भक्ती आहेर, ऋतुजा आहेर व किश्मरा देवरे यांनी आपल्या चमकदार कामिगरीने संघास विजयश्री मिळवून दिली. हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
ठरला असून, त्यांना शाळेचे प्रशिक्षक निसार सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी संघाचे शाळेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार ,सप्तशृंगी महिला बँकेच्या अध्यक्ष मीनाक्षीताई पवार, शाळेचे अध्यक्ष शैलेश पवार, सचिव अनुप पवार, स्कूल कमिटीचे अध्यक्ष विलास शिरोरे, गजानन सोनजे, शाळेचे मुख्याध्यापक बी. एन. शिंदे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जे. एल. पटेल, समन्वयक विश्वेशरण तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व राज्य पातळीवरील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)

Web Title: Pawar's school girls' football team at the state level