कॅम्प वाचनालयातर्फे पवार यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:48 IST2021-02-05T05:48:31+5:302021-02-05T05:48:31+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र भामरे उपस्थित होते. प्रास्ताविक, स्वागत व परिचय वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. भास्कर तिवारी यांनी केले. ...

Pawar felicitated by Camp Library | कॅम्प वाचनालयातर्फे पवार यांचा सत्कार

कॅम्प वाचनालयातर्फे पवार यांचा सत्कार

प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र भामरे उपस्थित होते. प्रास्ताविक, स्वागत व परिचय वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. भास्कर तिवारी यांनी केले. संजय पवार यांनी बजावलेली कामगिरी, शौर्य आणि जीवावर खेळून वाचवलेले जीव याविषयी तिवारी यांनी माहिती दिली. राजेंद्र भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय पवार यांनी आपल्या सेवेतील विविध अनुभव सांगितले. सूत्रसंचालन प्रा. दीपक आहिरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. विनोद गोरवाडकर यांनी केले. कार्यक्रमास रमेश उचित, पोपटराव देशमुख, प्रा. जयंत कटारे, जगदीश वैष्णव, संजय पांडे, विवेक पाटील, विजयालक्ष्मी अहिरे, जगदीश जहागीरदार, मधुसूदन राजधर समाधान, शिंपी दर्शन पाटील, ग्रंथपाल रेखा उगले, सुरेखा सोनवणे, दिनेश कुलकर्णी, प्रमोद भावसार, निर्मला शिरसाठ उपस्थित होते.

Web Title: Pawar felicitated by Camp Library