शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाने फटकारले : महापौरच मांडणार सत्ताधाऱ्यांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:20 IST

पालिकेतील समांतर सत्ताकेंद्राला चाप

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेत महापौरांना डावलत परस्पर निर्णय घेणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षनेत्यांनी फटकारले असून, समांतर सत्ताकेंद्राला चाप लावला आहे. यापुढे, महापौरच सत्ताधाऱ्यांची भूमिका मांडतील आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी ५ वाजता महापौर दालनात एकत्र बसून नागरिकांचे प्रश्न सोडवावेत, असे आदेश पक्षनेत्यांनी दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महापालिकेत भाजपाने पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत संपादन करत सत्ता हस्तगत केली. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत सत्ताधारी भाजपा पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद वेगवेगळ्या घटनांनी समोर आल्याने पक्षाची बदनामी होऊ लागली. महापौरांना डावलत काही पदाधिकाऱ्यांनी परस्पर बैठका घेण्याचा धडाका लावला. अधिकाऱ्यांना आपल्या कक्षात बोलावत त्यांना धमकावण्याच्याही चर्चा ऐकायला येऊ लागल्या. मागील आठवड्यात महापालिकेच्या गाळेधारकांची परस्पर बैठक स्थायी समितीच्या सभागृहात बोलाविण्यात आली. या बैठकीला स्थायी समिती सभापती, सभागृहनेता व भाजपा गटनेता यांनी उपस्थिती लावली. मात्र, महापालिका मुख्यालयात उपस्थित असलेल्या महापौर रंजना भानसी या बैठकीविषयी पूर्ण अनभिज्ञ होत्या. परस्पर बैठक घेतल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती, तर भाजपा गटनेत्यांनी महापौरांच्याच आदेशान्वये सदर बैठक बोलाविल्याचे ठोकून दिले होते. या साऱ्या प्रकाराने भाजपातील पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद पुन्हा एकदा अधोरेखित झाला होता. त्याची गंभीर दखल पक्षनेत्यांनी घेतली असून, या प्रकाराबद्दल पदाधिकाऱ्यांना फटकारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यापुढे, भाजपाचा महापालिकेतील कोणताही पदाधिकारी परस्पर सत्ताधारी पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडणार नाहीत. तसेच महापौरच याबाबत भूमिका स्पष्ट करतील. सर्व पदाधिकाऱ्यांनी रोज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महापौर कार्यालयात एकत्र येऊन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावेत, गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचनाही संबंधिताना दिल्याचे समजते.पत्रकबाजीलाही लगामकाही उत्साही पदाधिकाऱ्यांनी पत्रकबाजी करत हस्तक्षेप सुरू केल्याने त्याचीही गंभीर दखल पक्षनेत्यांनी घेतल्याचे समजते. मध्यंतरी एका पदाधिकाऱ्याने आरोग्य विभागाला पत्र देत रात्रीच्या सफाईला विरोध केला होता तर महापौरांनी त्याचे समर्थन केले होते. याशिवाय, महापौरांनी नालेसफाईबाबत यू टर्न घेतल्यावरही संबंधित पदाधिकाऱ्याने प्रशासनाला पत्र देत नालेसफाईच्या चौकशीची मागणी केली होती. पक्षनेत्यांनी या पत्रकबहाद्दरांनाही वेसण घातली असून, त्याबाबत सज्जड दम दिल्याचे वृत्त आहे.