शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

संसद ग्राम दत्तक योजना : दिंडोरीच्या उद्योजकांना बजावणार नोटिसा

By admin | Updated: June 10, 2015 22:59 IST

समाजसेवेचा खासदार मागणार ‘हिशेब’

 नाशिक : शासनाच्या निर्णयानुसार उद्योजकांनी त्यांच्या नफ्यातील दोेन टक्के रक्कम स्थानिक क्षेत्रातील विकासकामांसाठी वापरणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात त्याचा समाजहितासाठी व समाजसेवेसाठी उद्योजकांनी किती वापर केला याचा हिशेब मागण्याचा निर्णय दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून दिंडोरी तालुक्यातील शंभरहून अधिक खासगी कंपन्यांच्या मालकांना नोेटिसा बजावण्याची सूचना त्यांनी प्रांत यांना केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व खासदारांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन ते आदर्श करण्यासाठी संसद ग्राम दत्तक योजना राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी अंजनेरी, तर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अवनखेड गाव दत्तक घेतले आहे. बुधवारी (दि. १०) या दत्तक घेतलेल्या गावाच्या विकासासंदर्भात आवश्यक ते नियोजन व सूचना मागविण्यासाठी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिंडोरी पंचायत समितीत एका बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस तालुक्यातील शंभरहून अधिक कंपन्यांच्या मालकांना व उद्योजकांनाही उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले होते. प्रत्यक्षात या बैठकीसाठी बोटावर मोजण्याइतपत सात ते आठच उद्योजक हजर होते. त्यातही जे उपस्थित होते त्यांनी आमच्याकडून आधीच महापुरुषांच्या जयंतीसाठी ‘वर्गणी’ गोळा केली जात असल्याचे गाऱ्हाणे मांडले. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अवनखेड गावच्या विकासाबाबत आपल्या काही कल्पना किंवा सूचना असतील तर त्या मांडण्यासाठी तसेच समाजासाठी काहीतरी योगदान देण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आपल्याला येथे बोलावल्याचे खडे बोल या उद्योजकांना सुनावल्याचे कळते. तसेच प्रांत भोगे यांना बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या सर्व उद्योजकांना नोटिसा बजावण्याची सूचना केली. बैठकीस पंचायत समितीच्या सभापती अलका चौधरी, जि. प. सदस्य मनीषा बोडके, प्रभारी तहसीलदार कनोजे, गटविकास अधिकारी कराड यांच्यासह पंचायत समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी) 

शासनाच्या निर्णयानुसार कंपन्यांना व उद्योजकांना स्थानिक परिसराचा विकास व समाजसेवेसाठी त्यांच्या एकूण नफ्यातील दोन टक्के रक्कम खर्च करावी लागते. गेल्या पाच वर्षांत दिंडोरी तालुक्यातील किती कंपन्यांनी अशी रक्कम खर्च केली याची माहिती मागविण्यासाठी उद्योजकांना नोटिसा बजावण्याची सूचना आपण प्रांत यांना केली आहे. समाजासाठी काहीतरी देणे लागतो याचाही विचार उद्योजक करण्यास विसरू लागले आहेत.- हरिश्चंद्र चव्हाण, खासदार