शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांचे भाव उतरले; ग्राहकांत समाधान

By admin | Updated: August 20, 2014 00:42 IST

आवक वाढली : मेथी, शेपू चार रुपये जुडी

पंचवटी : गेल्या अनेक महिन्यांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने भावात घट झाली आहे. पालेभाज्यांचे भाव उतरल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील दोन दिवसांपासून मेथी, शेपू तसेच कोथिंबीरची आवक वाढत चालल्याने भाव जवळपास निम्म्याने घसरल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले. बाजार समितीत झालेल्या लिलावात मेथी ३५० रुपये शेकडा, शेपू ३०० रुपये, तर कोथिंबीर ५०० रुपये शेकडा दराने विक्री झाली. किरकोळ बाजारात कोथिंबीर पाच रुपये, मेथी पाच रुपये, तर शेपू दहा रुपये प्रति जुडी दराने विक्री होत आहे. काही दिवसांपूर्वी पालेभाज्यांच्या भावात वाढ झाल्याने ग्राहकांना प्रति जुडीसाठी २५ ते ३० रुपये मोजावे लागत होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पालेभाज्यांचे भाव कमी झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. पावसाने उघडीप दिल्याने आवक वाढत आहे. त्यातच शेतमाल काहीसा हलक्या प्रतीचा असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याने सांगण्यात आले आहे. आगामी कालावधीत पालेभाज्यांची आवक वाढली तर भावात आणखी घट होण्याची शक्यता बाजार समितीने वर्तविली आहे. (वार्ताहर)