शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

संशयित इराणीकडून आठ गुन्हे उघडकीस

By admin | Updated: January 23, 2016 23:55 IST

लूट : कोल्हारच्या सराफाकडून २५ तोळे सोने हस्तगत

इंदिरानगर : शहर परिसरात पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिक व महिलांची लूट करणारा श्रीरामपूरमधील संशयित कंबर नुरअली इराणी (२७) यास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे़ त्याने इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत लुटीसह चेनस्रॅचिंगच्या आठ गुन्ह्यांची कबुली दिली असून, चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या कोल्हारच्या एका सराफाकडून २५ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे़ पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे गतवर्षी घडलेले तोतया पोलीस व चेनस्रॅचिंगच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना इंदिरानगर पोलिसांना श्रीरामपूरमधील कंबर नुरअली इराणी याची माहिती मिळाली़ इंदिरानगरच्या पोलीस पथकाने श्रीरामपूरला सापळा रचून त्यास अटक करून सखोल चौकशी केली असता त्याने इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील चार पोलीस बतावणी व दोन चेनस्नॅचिंगची कबुली दिली. तसेच उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतसुद्धा दोन वेळेस तोतया पोलीस बनून वृद्ध व्यक्तींकडील सोन्याची चोरी केल्याचे तपासात समोर आले़संशयित इराणीने चोरीचा मुद्देमाल अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील कोल्हार येथील सराफी व्यावसायिक अजय विजय देडगावकर यांना विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी देडगावकरला अटक करून त्याच्याकडून २५ तोळे सोने जप्त केल्याचे पोलीस उपायुक्त धिवरे यांनी सांगितले़ दरम्यान, या संशयिताने शहरात आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे़ परिमंडळ दोनमध्ये गत महिनाभरात तोतया पोलीस किंवा चेनस्नॅचिंगचा एकही गुन्हा घडला नसल्याचा दावाही उपायुक्त धिवरे यांनी केला आहे. (वार्ताहर)