शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षा मे महिन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षा मे महिन्यात ऑनलाईन स्वरूपात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षा मे महिन्यात ऑनलाईन स्वरूपात होणार आहेत. विद्यापीठातर्फे या परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून, या वेळापत्रकात समावेश असलेल्या शिक्षणक्रमांच्याच परीक्षा मे महिन्यात होणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाले आहेत. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने पहिली ते नववी व अकरावीच्या तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षाही रद्द करून विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्याही १९ एप्रिलला होणाऱ्या परीक्षा २ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याशिवाय अन्य विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने डिसेंबर २०२०मध्ये प्रलंबित राहिलेल्या परीक्षा आता मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना लिंकद्वारे परीक्षा प्रणालीत सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना याच लिंकच्या माध्यमातून सराव परीक्षेची सुविधाही विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.

इन्फो-

अशी होईल ऑनलाईन परीक्षा

ऑनलाईन परीक्षा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागेल. त्यासाठी प्रथम कायम नोंदणी क्रमांक (पीआरएन) टाकावा लागेल. स्‍क्रीनवर दिसणारे नाव बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर विद्यार्थ्याला स्वत:ची जन्मतारीख टाकावी लागणार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर एक तासाचा कालावधी मिळेल. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून, सकाळ सत्रात सकाळी आठ ते दुपारी एक आणि दुपारच्या सत्रात तीन ते आठ अशी वेळ उपलब्ध असेल. परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रोग्राम कोडनुसार पेपर किती तारखेला कुठल्या वेळी, कुठल्या लॉग इन स्लॉटमध्ये आहे, हे पाहून विद्यार्थ्याने पुरेशा वेळेआधी परीक्षेला सुरुवात करावी. विद्यार्थांना परीक्षेचा स्लॉट टाईम पाच तासांचा असला, तरी प्रत्यक्ष परीक्षेसाठी वेळ साठ मिनिटांचा देण्यात येणार असून, परीक्षेत ५०पैकी ३० प्रश्न साठ मिनिटात सोडवावे लागणार आहेत. या प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे साठ गुणांची परीक्षा होणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.