शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आॅनलाइन शॉपिंगचा टक्का वाढला

By admin | Updated: November 11, 2015 21:35 IST

दिवाळीची खरेदी : आकर्षक आॅफर्समुळे ग्राहक आकर्षित

नाशिक : दिवाळीनिमित्ताने शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत असली तरी आॅनलाइन शॉपिंगवरही दणक्यात खरेदी सुरू आहे. बाजारभावापेक्षा कैकपटीने कमी दर तसेच आकर्षक योजना यामुळे आॅनलाइन खरेदीकडे वाढता कल दिसून येत आहे. त्याचा स्थानिक बाजारपेठेवरही प्रतिकूल परिणाम होत आहे.शहरातील विविध बाजारपेठांमध्ये जाऊन विविध वस्तूंची खरेदी करण्याबरोबरच ‘आॅनलाइन शॉपिंग’चाही बोलबाला गेल्या दोन वर्षांपासून सुरू झाला आहे. आॅनलाइन शॉपिंग कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वस्ताईच्या आॅफर्स दिल्या जात आहेत. सतत मोबाइलवर धडाडणारे आॅफर्सचे मॅसेजेस्, कंपन्याकडून येणारे ई-मेल, सतत दूरचित्रवाणीवरून दिसणाऱ्या आॅनलाइन शॉपिंगच्या जाहिराती यामुळे आॅनलाइन खरेदी करण्याकडे ग्राहकाचा कल झुकू लागला आहे.प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आल्याने कुतूहलापोटीदेखील अ‍ॅप डाऊनलोड करून आॅनलाइन खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, होम अप्लायन्सेस, मोबाइल, टीव्ही, एसी, म्युझिक सिस्टम, रेफ्रिजरेटर अशा एक ना अनेक वस्तू सहज उपलब्ध झाल्याने आॅनलाइन खरेदी ग्राहकांचा कल वाढू लागला असून, थेट दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा अनेक आॅफर्स आणि डिस्काउंटमुळे विविध वस्तूंची खरेदी आता आॅनलाइन केली जात आहे. सवलतीचे दर असल्याने ज्या कंपनीच्या उत्पादनाचे दर ग्राहकाला परवडतील अशा उत्पादनांच्या वस्तू खरेदी करणे सोयीचे ठरत आहे.आॅनलाइन शॉपिंगसाठी स्नॅप डील, फिल्प कार्ट, अ‍ॅमेझॉन, नापतोल, क्विकर, ई-बे इंडिया, अशा संकेतस्थळांची नावे अग्रक्रमाने घेण्यात येतात. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॅश आॅन डिलेव्हरी अशा विविध पर्यायांतून पैसे देण्याची सुविधा असल्याने ग्राहकांना आॅनलाइन खरेदी करणे सुकर झाले आहे. आज आॅनलाइन शॉपिंग शहरापुरतीच मर्यादित असली तरी आगामी दहा वर्षांत सगळ्या पातळ्यांवर यात वाढ होण्याची शक्यता असल्याने संकेतस्थळांची रचना आणि धोरणांची आखणी केलेली दिसून येते. ई-कॉमर्स संकल्पनेमुळे आॅनलाइन खरेदी सोपी झालेली असताना बाजारपेठेपेक्षा भरमसाठ आणि आकर्षक डिस्काउंटमुळे आता ग्राहकांची पाउले आॅनलाइन खरेदीकडे वळू लागली आहेत. (प्रतिनिधी)