शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध कार्यक्रम उत्साहात

By admin | Updated: September 6, 2016 22:18 IST

विद्यार्थीच बनले शिक्षक : लासलगावी सांस्कृतिक कार्यक्रम; अंदरसूल येथे गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांकडून अध्यापनाचे अनुभव कथन

नाशिक : शिक्षक दिनानिनिमित्त जिल्ह्यातील विविध शाळा- महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली. अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.येवला : श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रशांत भंडारे, संस्थेचे विश्वस्त व सामाजिक कार्यकर्ते भूषण लाघवे, प्राचार्य कदम डी. के. कदम आणि प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतरकर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. बळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. के.वी. ढमाले यांनी केले. लासलगाव : येथील मिशन स्कूलमध्ये शिक्षकदिनानिमित्त विद्यार्थिनींनी एक दिवस शिक्षकांची भूमिका स्वीकारत वर्गात तास घेतले. सांस्कृतिक कार्यक्र मात विद्यार्थ्यांनी अनेक कलागुण सादर केले . यावेळी शाळेचे प्राचार्य जोसेफ खडांगळे, एम.जे. मोहनराव, ट्रेझरर असित हलडार, रु बी खडांगळे, शकुंतला राव, सुदर्शन आदि उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील गाणी सादर केली. काहींनी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यात पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे कलाकृती सादर केल्या. तसेच शिक्षकांनीही प्रतिक्रि या मांडल्या. अंदरसूल : येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणनू साजरी करण्यात आली. या वेळी भरत धुमाळ, सुरेखा धुमाळ, राजूभाऊ बांगर, संतोशजी केंद्रे, बळूभाऊ धुमाळ, प्रवीण धुमाळ व नितीन सुराडे यांच्या हस्ते राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. विद्यार्थ्यांनी अतिशय चोखपणे दैनंदिन कामकाज पार पाडले. विद्यार्थ्यांना आवडीने शिकवत त्यांच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळविला. विशेष म्हणजे प्राचार्यांचीही भूमिका विद्यार्थ्याने साकारली. यासाठी शाळेचे मुख्याध्यानक विक्र म मिंगलानी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकव शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या जन्म दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक एस.एस.आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांचीभूमिका साकारून दिवसभर आध्यापनाचे कामकाज केले. शाळेचे मुख्याध्यापक एस. एस. आहेर, शिक्षक बी. वाय. सोनवणे, आर. एस. निकम, युवराज दाणी आदि शिक्षकांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस. एस. आहेर, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पूनम बच्छाव या विद्यार्थिने केले.आभार पल्लवी शेवाळे हिने मानले. (लोकमत चमू)