शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्क्याविना विशेष अधिकारी कागदावरच

By admin | Updated: April 27, 2017 02:03 IST

नाशिक : शासनाकडे या अधिकाऱ्यांना देण्यासाठी शिक्के नसल्याने जिल्ह्यात सहाशे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कागदोपत्री उरल्या आहेत.

 नाशिक : अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपा, शिवसेना सरकारच्या कारकिर्दीत कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी अधिकारीपदाचा मान मिळाला असला तरी, शासनाकडे या अधिकाऱ्यांना देण्यासाठी प्रमाणपत्र, ओळखपत्र व महत्त्वाचे म्हणजे शिक्के नसल्याने जिल्ह्यात सहाशे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या निव्वळ कागदोपत्री उरल्या आहेत. पूर्वीच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात व सध्याच्या युती सरकारच्या काळात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची सोय म्हणून त्यांच्या नेमणुका विशेष कार्यकारी अधिकारीपदी करण्याची प्रथा आहे. त्यानुसार भाजपा सरकार सत्तेवर येताच, पक्ष कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्यांची नावे या पदासाठी मागविण्यात आली. आमदार, खासदारांनी या पदासाठी कार्यकर्त्यांच्या नावांची शिफारस पालकमंत्र्यांकडे केल्यानंतर जवळपास गेल्या वर्षी अशा नावांना मान्यता देण्यात आली व त्यानंतर ज्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी शिफारस करण्यात आली, अशा सर्वांची पोलीस यंत्रणेकडून चारित्र्य पडताळणी केल्यानंतर निकषात बसलेल्या कार्यकर्त्यांची नावे सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली. मंजुरी मिळाल्यानंतर राजपत्रात त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात दोन टप्प्यामध्ये ६०२ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाकडून या अधिकाऱ्यांसाठी नियुक्तिपत्र, ओळखपत्र व शिक्के पुरविले जातात. नियुक्तीची मुदत संपुष्टात आल्यानंतर शासनाकडून शिक्के व ओळखपत्रे परत घेण्यात येतात. परंतु यंदा शासनाने शिक्क्यांमध्ये बदल केल्यामुळे जुने शिक्के मोडीत निघाले, तर शासनाकडून नाशिक जिल्"ासाठी फक्त विशेष कार्यकारी अधिकारी या पदाचे फक्त २५० शिक्केच पुरविण्यात आले. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार २५० शिक्क्यांचे वाटप करण्यात आले, मात्र ओळखपत्र तसेच नियुक्तिपत्र अजूनही प्राप्त न झाल्याने ज्यांना शिक्के मिळाले त्यांना त्यांच्या अधिकाराचा वापर करण्यात अडचणी येत आहेत, तर राजपत्रात ज्यांची नावे प्रसिद्ध झाली त्यांना शिक्के, नियुक्तिपत्र व ओळखपत्र नसल्याने कागदोपत्रीच कार्यकारी अधिकारी म्हणून वावरावे लागत आहे. (प्रतिनिधी)