शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नोटिसा नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST

नाशिक : राज्य शासनाच्या निर्देशानुसार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शहरातील प्रत्येक भागाचा सिटी सर्व्हे करण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांना ...

नाशिक : राज्य शासनाच्या निर्देशानुसार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शहरातील प्रत्येक भागाचा सिटी सर्व्हे करण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांना ‘प्रॉपर्टी कार्ड’ उपलब्ध करून देण्यासाठीच नागरिकांकडून त्यांच्या घरांचे खरेदी खत, सातबारा, एन ए प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. त्यामुळे नोटिसांबद्दल कोणताही गैरसमज करून न घेता नागरिकांनी त्यांच्या मालमत्तांची कागदपत्रे भूमी अभिलेखच्या पंडित कॉलनीतील कार्यालयात जमा करून स्वत:च्या मालमत्तेचे कायमस्वरूपी दस्तऐवज तयार करुन घ्यावेत, असे आवाहन भूमी अभिलेख विभागाच्या विशेष उपअधीक्षक रोहिणी दहीफळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १०२ अन्वये ज्यांच्या नावावर घरांची मालमत्ता आहे, त्या मालमत्तांची चौकशी करून त्यांचे दस्तऐवजीकरण करणे तसेच संबंधित नागरिकांना त्या कागदपत्र पडताळणीनंतर त्या मालमत्तेचे प्रॉपर्टीकार्ड देणे ही नियमित प्रक्रिया आहे. नाशिकमध्ये भूमापनची तीन कार्यालये असून त्या माध्यमातून सध्या द्वारका आणि इंदिरानगरच्या परिसरातील नागरिकांना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोटीस ही नागरिकांच्या मालमत्तेचे प्रॉपर्टीकार्ड करून देण्यासाठीच असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता लवकरात लवकर कागदपत्रे दाखल करावीत. भविष्यात सर्व मालमत्तांचे सातबारा बंद होऊन केवळ सिटी सर्व्हेचे प्रॉपर्टीकार्डच मिळकत पत्रिका म्हणून नागरिकांना जपून ठेवले तरी पुरेसे होणार आहे. त्यामुळे भविष्यासाठीची तरतूद म्हणून नागरिकांनी त्यांची कागदपत्रे सादर करून प्रॉपर्टी कार्ड मिळवावे, असे आवाहन देखील दहीफळे यांनी केले आहे. येत्या वर्षभरात गावठाणवगळता शहरातील सर्व भागांना अशा प्रकारच्या नोटिसा देऊन त्यांना प्रॉपर्टीकार्ड करून घेण्यासाठी सूचीत केले जाणार आहे.