शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

सेवाकर वाढीचा महापालिकेला फटका

By admin | Updated: June 11, 2016 23:47 IST

अंदाजित खर्चात वाढ : निविदांमध्ये नव्याने दुरुस्ती

 नाशिक : केंद्र सरकारने सेवाकरात १५ टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने त्याचा आर्थिक फटका महापालिकेलाही बसणार असून, अनेक प्रस्तावांच्या प्राकलन (अंदाजित खर्च) दरात वाढ होणार आहे. सेवाकर वाढीनंतर महापालिकेने आता उद्यान देखभालीसह काही कामांच्या निविदांमध्ये नव्याने दुरुस्ती सुचविली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर केल्यानुसार वाढीवसेवा कर व कृषी कल्याणकर दि. १ जूनपासून देशभर लागू झाला. केंद्र सरकारने सेवाकर १२.३६ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत नेला आहे. याशिवाय ०.५ टक्के कृषी कल्याण अधिभार तर ०.५ टक्के स्वच्छ भारत अभियानासाठी लागणारा अधिभार लागू असल्याने एकूण सेवाकर १५ टक्के जाऊन पोहोचला आहे. वाढीव सेवाकर लागू झाल्याने त्या अंतर्गत येणाऱ्या सेवाही महागल्या आहेत. महापालिकेमार्फत विविध कामांच्या निविदा काढल्या जातात. प्रस्तावित कामांचे प्राकलन तयार करताना त्यात सेवाकरही अंतर्भूत केला जातो. महापालिकेमार्फत अनेक प्रस्तावांच्या निविदाप्रक्रिया सुरू आहेत, तर काही निविदांची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. वाढीव सेवाकर हा संबंधित ठेकेदाराकडूनच वसूल केला जात असल्याने प्राकलन दरही त्यांच्याकडून वाढीव दरानेच नमूद केले जातील. परिणामी, अंदाजित खर्च वाढणार असल्याने निविदांचे दर जादा जाण्याची शक्यता आहे. अर्थात त्याचा सारा आर्थिक बोजा महापालिकेच्याच खजिन्यावर पडणार आहे. वाढीव सेवाकर लागू झाल्यानंतर महापालिकेने आता कार्यवाहीत असलेल्या निविदांची फेरपडताळणी सुरू केली असून, त्यानुसार प्राकलन दरातही बदल केले जात आहेत. याशिवाय, यापुढे नव्याने निविदाप्रक्रिया राबविताना त्यात वाढीव १५ टक्के सेवाकर अंतर्भूत करून प्राकलने तयार केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)