Niphad was found again with 1 rupee of corona | निफाडला आढळला पुन्हा कोरोनाचा 1 रु ग्ण

निफाडला आढळला पुन्हा कोरोनाचा 1 रु ग्ण

ठळक मुद्देनाशिक येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

निफाड : निफाड शहरात दि 5 जुलै रोजी कोरोनाचा रु ग्ण आढळला असून शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे
निफाड शहरात दि 4 जुलै रोजी कोरोनाचे एकाच कुटुंबातील 2 रु ग्ण आढळले होते. सदर दोन्ही रु ग्णावर नाशिक येथे उपचार चालू आहेत. दि 5 जुलै रोजी निफाड शहरातील 55 वर्षीय रु ग्ण कोरोणाबाधित आढळल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आजपर्यंत निफाड शहरात 6 कोरोणाबाधित रु ग्ण आढळले होते. त्यातील 2 रु ग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 4 रु ग्णावर उपचार चालू आहेत सदर 4 रु ग्ण राहत असलेले शहरातील परिसर सील करण्यात आले असून हे भाग कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आहे.

Web Title: Niphad was found again with 1 rupee of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.