शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

नऊशे कोटी रुपये पडून

By admin | Updated: November 19, 2016 00:42 IST

क्षमता संपली : कोट्यवधी रुपयांच्या नोटा ठेवायच्या कुठे ? नागरी बँकांना प्रश्न

 संजय पाठक  नाशिकगेल्या बुधवारपासून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा नागरी सहकारी बॅँकांमध्ये डिपॉझिट झाल्यानंतर आजमितीला नऊशे कोटी रुपये जमा झाले असून, नागरी बॅँकांची साठवणूक क्षमताच संपली आहे. स्टेट बॅँकेकडे अशीच परिस्थिती असल्याने या नोटा ठेवायच्या कुठे, असा प्रश्न नागरी बॅँकांना पडला आहे. नाशिक जिल्ह्यात ४४ नागरी सहकारी बॅँका असून, लाखो नागरिकांचे खाती त्यात आहेत. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली; मात्र त्याचबरोबर पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा सर्व बॅँकांमध्ये जमा करता येतील असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दररोज हजारो नागरिक बॅँकांमध्ये नोटा जमा करीत आहेत. नागरी सहकारी बॅँकाकडेही ८० ते ९० कोटी रुपयांची रक्कम रोज जमा होत आहेत. शुक्रवारपर्यंत सुमारे ९०० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. साधारणत: जमा होणारी रक्कम बॅँका अन्य बॅँकांत डिपॉझिट करतात, आता या बाद होणाऱ्या नोटा स्टेट बॅँकेला द्याव्या लागणार आहेत. मात्र, ४४ नागरी सहकारी बॅँका एका बाजूला आणि एक स्टेट बॅँक एका बाजूला अशी रक्कम जमा होण्याची स्थिती आहे. म्हणजे एकट्या स्टेट बॅँकेकडेच सातशे आठशे कोटी रुपये जमा असून त्यांच्याकडेच नोटा ठेवायला जागा नाही. त्यामुळे त्या नागरी बॅँकांकडून नोटाच स्वीकारत नसल्याची गंभीर स्थिती आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्या तरी या नोटा सुरक्षितपणे स्टेट बॅँकांच्या माध्यमातून जमा करण्यासाठी मुळातच त्या स्टेट बॅँकांनी स्वीकरणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरी बॅँक असोसिएशनने बराच प्रयत्न केल्यानंतर काही प्रमाणात नोटा स्वीकारल्या जात आहेत. म्हणजेच एखाद्या बॅँकेने आपल्याकडे जमलेले दोन ते तीन कोटी रुपये जमा करून घेण्यास सांगितल्यानंतर जेमतेम पन्नास लाख रुपयेच स्टेट बॅँक घेते. त्यामुळे नागरी बॅँकांना अद्याप दिलासा मिळाला नसून, आता जमा असलेली रक्कम कशी सांभाळावी या विवंचनेत नागरी बॅँक संचालक सापडले आहे.