शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
4
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
5
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
6
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
7
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
8
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
9
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
10
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
13
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
14
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
15
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
16
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
17
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
18
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
19
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
20
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

‘निमा इंडेक्स’ प्रदर्शनाचा समारोप

By admin | Updated: April 27, 2015 23:50 IST

‘निमा इंडेक्स’ प्रदर्शनाचा समारोप

 सातपूर : ‘मेक इन इंडिया’चा संदेश देत गेल्या चार दिवसांपासून भरविण्यात आलेल्या ‘निमा इंडेक्स २०१५’ या औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप झाला. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील ठक्कर मैदानावर निमाच्या वतीने इंडेक्स २०१५ औद्योगिक प्रदर्शन २४ ते २७ एप्रिल दरम्यान भरविण्यात आले होते. समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजितसिंग, सिमेन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील माथुर, महाराष्ट्र बॅँकेचे कार्यकारी संचालक आर. आत्माराम, तसेच निमाचे अध्यक्ष एच. बी. थॉण्टेश, उपाध्यक्ष संजीव नारंग, मधुकर ब्राह्मणकर, मंगेश पाटकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी एचएएलचे दलजीतसिंग यांना सांगितले की, एचएएलने धोरणात्मक निर्णय घेऊन नाशिकच्या लघुउद्योजकांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे. परंतु नाशिकच्या उद्योजकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामानाने बंगरूळू, हैदराबाद, पुणे, नोयडा येथील लघुउद्योजकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. नाशिकच्या लघुउद्योजकांनी आपल्या कुवतीप्रमाणे एचएएलसाठी कॉम्पोनंटचा पुरवठा करण्याचे आवाहन केले.
सिमेन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील माथुर यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असून, अजून सक्षम करण्यासाठी उद्योजकांनी जागतिक दर्जाचे दर्जेदार उत्पादन निर्मितीकडे लक्ष दिले पाहिजे. भारतीय उद्योजकांनी जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष रवि वर्मा यांनी केले. औद्योगिक प्रदर्शनाची सविस्तर माहिती इंडेक्स समितीचे अध्यक्ष एच. बी. थॉण्टेश यांनी दिली. स्नेहा ओक आणि समीर परवा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निमा डिरेक्टरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रचे हिरामण अहेर, तसेच संतोष मंडलेचा, सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे, व्हिनस वाणी, सुधाकर देशमुख, शैलेश नारखेडे, उदय खरोटे, हर्षद ब्राह्मणकर, संदीप सोनार, मिलिंद राजपूत, भरत येवला, उमेश कोठावदे, विवेक पाटील आदिंसह उद्योजक निमा पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)