शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारतात भारतीय ज्ञानच देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 01:44 IST

भारताची संस्कृती प्राचीन असल्यामुळे इतर देशातील लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. मात्र आपल्या देशात सध्या पाश्चात्य ज्ञान मोठ्या प्रमाणावर शिकविले जात असून, यामुळे आपणच आपली संस्कृती जोपासत नाही. त्यामुळे आपल्या देशात भारतीय ज्ञानच देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुनर्उत्थान विद्यापीठ, अहमदाबादच्या कुलगुरू इंदुमती काटदरे यांनी केले.

ठळक मुद्देइंदुमती काटदरे : कृष्णाजी वझे स्मृतिदिनी गौरव ग्रंथाचे प्रकाशन

नाशिक : भारताची संस्कृती प्राचीन असल्यामुळे इतर देशातील लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. मात्र आपल्या देशात सध्या पाश्चात्य ज्ञान मोठ्या प्रमाणावर शिकविले जात असून, यामुळे आपणच आपली संस्कृती जोपासत नाही. त्यामुळे आपल्या देशात भारतीय ज्ञानच देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुनर्उत्थान विद्यापीठ, अहमदाबादच्या कुलगुरू इंदुमती काटदरे यांनी केले.भारतीय इतिहास संकलन समिती, नाशिक व वैदिक शिल्प शोध प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.१५) रुंग्टा हायस्कूल येथे कृष्णाजी विनायक वझे यांच्या १५०व्या स्मृतिदिनानिमित्त ‘गौरव ग्रंथ : भाग १’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून काटदरे बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारताच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या काही गोष्टी सांगितल्या. तसेच भारताला लवकरात लवकर प्रगती करायची असेल तर आपल्या भारताचा प्राचीन इतिहास समोर आणलाच पाहिजे.आपले प्राचीन विचार हे अजरामर असून, कोणताही देश याची बरोबरी करू शकत नाही. आपले लोक याला त्याला पुरून उरण्याची भाषा करत असतात. मात्र आपल्या विचारांनी लोकांवर पुरून उरण्याची भाषा आपण करणे आवश्यक आहे. यामुळे इतर देशांना आपले महत्त्व कळेल, असे त्यांनी सांगितले.या ग्रंथांचे संपादन मोहिनी पेणेकर यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधक ओमप्रकाश कुलकर्णी हे होते. यावेळी इतिहास संकलन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भामसे, आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्राजक्ता बस्ते, जयंत गायधनी, विजयप्रसाद उपाध्याय आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बागेश्री पारनेरकर यांनी तर आभार देवेंद्र पंड्या यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिकhistoryइतिहासcultureसांस्कृतिक