नाशिकचा नंदुरबारवर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:15 IST2021-03-05T04:15:51+5:302021-03-05T04:15:51+5:30

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे , धुळे व शिरपूर येथे आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय साखळी स्पर्धेतील ...

Nashik's victory over Nandurbar | नाशिकचा नंदुरबारवर विजय

नाशिकचा नंदुरबारवर विजय

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे , धुळे व शिरपूर येथे आयोजित १९ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या विभागीय साखळी स्पर्धेतील दुसर्‍या साखळी सामन्यात नाशिकच्या जिल्हा क्रिकेट संघाने नंदुरबार जिल्हा क्रिकेट संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. पहिल्या साखळी सामन्यात नाशिकने धुळे संघावर विजय मिळविला होता. गुरुवारी नाशिकने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करत नंदुरबार संघास ११३ धावांवर रोखले. त्यानंतर सलामीवीर स्वप्नील शिंदेच्या नाबाद ६० व ओम घाडगेसह ८४ धावांच्या सलामीच्या भागीदारीच्या जोरावर आठ गडी राखून सहजपणे दणदणीत विजय मिळविला .

नाशिकचा तिसरा सामना ६ मार्चला जळगावसमवेत होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : नंदुरबार ३२ षटकांत सर्वबाद ११३ , नाशिक १९ षटकांत २ बाद ११४ - स्वप्नील शिंदे नाबाद ६० व ओम घाडगे ४०. नाशिक ८ गडी राखून विजयी.

Web Title: Nashik's victory over Nandurbar