१९ वर्षांखाली मुलांच्या गटात नाशिक विजेता

By Admin | Updated: September 16, 2014 00:24 IST2014-09-15T22:56:49+5:302014-09-16T00:24:23+5:30

१९ वर्षांखाली मुलांच्या गटात नाशिक विजेता

Nashik winner in boys category under 19 years | १९ वर्षांखाली मुलांच्या गटात नाशिक विजेता

१९ वर्षांखाली मुलांच्या गटात नाशिक विजेता

 

नाशिक : येथे राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेस सुरुवात झाली असून, प्रथम सांघिक चॅम्पियनशिप व त्यानंतर वैयक्तिक चॅम्पियनशिप या माध्यमातून शालेय राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची निवड केली जाणार आहे.
दि. १५ रोजी स्पर्धेतील सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. त्यात १४, १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील राज्याच्या आठ विभागातील एकूण २२५ मुले व मुलींचा सहभाग आहे. या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. १४ वर्षांखालील मुलांमध्ये अंतिम सामना नागपूरविरुद्ध मुंबई झाला. त्यात नागपूर विजयी झाला. मुलींमध्ये १४ वर्षांखालील गटात मुंबई आणि नागपूर यांच्यात झालेल्या स्पर्धेत मुंबई विजयी झाले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नागपूर आणि मुंबई यांच्यात पुणे आणि नाशिक यांच्यात झालेल्या सामन्यात पुणे विजयी झाले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नागपूर आणि मुंबई यांच्यातील सामन्यात मुंबईने नागपूरवर मात केली. १९ वर्षांखाली मुलांच्या नाशिक आणि पुणे या संघांमध्ये झालेल्या सामन्यात नाशिकने बाजी मारली. तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या गटात पुण्याने मुंबईवर मात केली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या तांत्रिक समितीचे सदस्य अजित देशपांडे, चाफेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, बॅडमिंटन संघटनेचे अमित देशपांडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik winner in boys category under 19 years