नाशिक पश्चिम : मतदारांशी साधला संवाद

By Admin | Updated: September 29, 2014 00:55 IST2014-09-29T00:55:32+5:302014-09-29T00:55:45+5:30

भोसले यांची प्रचारफेरी

Nashik West: Dialogue with the voters | नाशिक पश्चिम : मतदारांशी साधला संवाद

नाशिक पश्चिम : मतदारांशी साधला संवाद

सिडको : रविवारचा सुटीचा दिवस पाहून उमेदवारांनी प्रचारफेऱ्यांवर भर दिला. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नितीन भोसले यांनी सातपूर भागातील प्रभाग २० मधील मतदारांच्या घरोघरी जाऊन संवाद साधला आणि आपल्या कार्याचा पट त्यांच्यासमोर मांडला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांच्या प्रचारफेऱ्यांना वेग आला आहे. त्यात मनसेचे आमदार नितीन भोसले यांनी गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठींवर भर चालविला आहे. मतदारसंघातील प्रभागांमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती यावेळी मतदारांसमोर ठेवली जात आहे. रविवारी भोसले यांनी सातपूर भागात प्रचार केला. मतदारांनीही त्यांचे स्वागत केले. विकासकामांसाठी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन भोसले यांनी केले. भोसले यांनी सातपूर चाळ, जयप्रकाशनगर, कोळीवाडा, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, निगळ गल्ली, भंदुरे गल्ली, स्वारबाबानगर, मेनरोड आदि भागांत प्रचार करत मतदारांशी संपर्क साधला. यावेळी प्रभाग २० च्या नगरसेवक सविता काळे, विभाग अध्यक्ष गोकुळ नागरे, नगरसेवक उषा शेळके, सलिम शेख, रेखा बेंडकुळे, सुरेश भंदुरे, रवि काळे, विजय भंदुरे, विजय अहिरे, सागर शेळके, संदीप भंदुरे, संदीप निगळ, योगेश गांगुर्डे, पप्पू वाघ, दौलत वागळे, मोहन वाघ, गोरख सोनवणे, ज्ञानेश्वर निगळ, रवींद्र काश्मिरे, गोपी पगार, राजेंद्र निकम, विठ्ठल पाटील, अनिल दिवेकर, संजय उगले, मनोज ढगे आदि प्रचारात सहभागी झाले होते.
(* वार्ताहर)

Web Title: Nashik West: Dialogue with the voters