शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात महापालिकेकडून ७० थकबाकीदारांच्या मिळकती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 18:58 IST

धडक कारवाई : रकमेचा भरणा न केल्यास मालमत्तांची विक्री

ठळक मुद्देमहापालिकेची लाखो रुपयांची घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांविरूद्ध कारवाईचा बडगाशहरातील उद्योगांसह रुग्णालयांचाही समावेश

नाशिक - महापालिकेची लाखो रुपयांची घरपट्टी थकविणाऱ्या मिळकतधारकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून आतापर्यंत ७० बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात, शहरातील उद्योगांसह रुग्णालयांचाही समावेश आहे. २१ दिवसांत संबंधित थकबाकीदारांनी रकमेचा भरणा न केल्यास मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री केली जाणार असल्याची माहिती कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.महापालिकेने मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी थकविणा-या मिळकतधारकांविरुद्ध मोहीम आरंभली आहे. त्यात प्रामुख्याने, लाखो रुपयांची घरपट्टी थकविणा-यांकडे मोर्चा वळविण्यात आला आहे. आतापर्यंत सहाही विभागमिळून ७० मिळकतींवर जप्तीची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. त्याबाबतची माहिती देताना दोरकुळकर यांनी सांगितले, नाशिकरोड विभागातील सुजाता बिर्ला हॉस्पिटल (१० लाख ३८ हजार), ब्ल्यू पोर्ट प्रा. लिमिटेड (४ लाख), सिडको विभागातील दातार स्विचगिअर (३ लाख ६१ हजार), डॉ. कांतीलाल धाडीवाल (५ लाख २५ हजार), स्वरुप स्टिल (८ लाख ४७ हजार), सागर मिल (४ लाख ६ हजार), सातपूर विभागातील शिवम टॉकीज (२ लाख ६६ हजार), व्हिनस पिस्टाल (४ लाख ८ हजार), एशियन इलेक्ट्रॉनिक्स (१७ लाख ९२ हजार), शेल इंडिया मार्केटिंग (२ लाख ४९ हजार), ज्योती उद्योग (६लाख ३८ हजार), पश्चिम विभागात विशेष लेखापरीक्षक कार्यालय (५ लाख ६४ हजार), श्यामराव केदार असोसिएट (१९ लाख), नाशिक पूर्व विभागातील अरविंद पोतनीस (७ लाख २ हजार), अलय कन्स्ट्रक्शन (१० लाख १७ हजार), सी.बी.लेले-दीक्षित (१८ लाख ७७ हजार), सुभद्रादेवी कपाडिया (१५ लाख ५३ हजार), यशोधन हेल्थकेअर (१० लाख ४५ हजार), निरंजन पेंटस् अ‍ॅण्ड हार्डवेअर (२ लाख २९ हजार), डी. पी. पिंगळे अ‍ॅण्ड ब्रदर्स (५ लाख ७४ हजार) या बड्या थकबाकीदारांच्या मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. येत्या २१ दिवसात संबंधितांनी थकबाकीचा भरणा न केल्यास लिलावाद्वारे मालमत्तांची विक्री केली जाणार असल्याचे दोरकुळकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका