शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीजवळ अपघातात नाशिकचे चौघे ठार

By admin | Updated: July 17, 2017 01:00 IST

नाशिक : नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या इनोव्हा मोटारीला भिवंडीजवळ महामार्गावर रविवारी (दि. १६) सकाळी अपघात झाला. इनोव्हाचे टायर फुटल्याने मोटार दुभाजकावर जाऊन आदळून समोरील रस्त्यावर उलटली.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या इनोव्हा मोटारीला भिवंडीजवळ महामार्गावर रविवारी (दि. १६) सकाळी अपघात झाला. इनोव्हाचे टायर फुटल्याने मोटार दुभाजकावर जाऊन आदळून समोरील रस्त्यावर उलटली. या भीषण अपघातात जुने नाशिकमधील हुड्डा कु टुंबातील दोघा महिलांसह लाखानी कुटुंबातील दांपत्यासह चौघांचा मृत्यू झाला. याबाबत भिवंडी तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकवरून मुंबईकडे घालेल्या  हुड्डा कुटुंबीयांच्या इनोव्हा (एम.एच.१५बीयू ९९४) मोटारीचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार दुभाजकावर आदळून मुंबई-नाशिक लेनवरून जाणाऱ्या ट्रकच्या समोर उलटली. ट्रकचालकाच्या सदर प्रकार वेळीच लक्षात आल्यानंतर त्याने तत्काळ ब्रेक लावले त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या अपघातामध्ये जुने नाशिकमधील वडाळानाका येथे राहणाऱ्या हुड्डा कुटुंबातील दोन महिलांचा मृतांत समावेश आहे. यामध्ये परवीन नसरुद्दीन हुड्डा (५६), आफसिन मोहिद हुड्डा (२५), गुलशन बहादूर लाखानी (५३, शिंगाडा तलाव), बहादूर मुसाभाई लाखानी (५५, शिंगाडा तलाव) असे मयतांची नावे आहेत. तसेच मोटारचालक मोहिद नसरुद्दीन हुड्डा व नसरुद्दीन सदरुद्दीन हुड्डा हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भिवंडीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातग्रस्त मोटारीच्या मागे या कुटुंबातील दोन मोटारी प्रवास करीत होत्या. पुढील मोटारीचा अपघात झाल्याचे लक्षात येताच तातडीने जखमींना पोलिसांनी पाठीमागून येणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांच्या मोटारीतून रुग्णालयात तत्काळ रवाना केले; मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दोघांचा जागेवर मृत्यू झाला होता. याबाबत अधिक तपास भिवंडी ग्रामीण पोलीस करीत आहेत.जुन्या नाशकात शोककळा : अपघातात जुने नाशिकमधील हुड्डा कुटुंबातील दोन महिलांसह लाखानी कुटुंबातील दांपत्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने जुने नाशिक परिसरावर शोककळा पसरली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अपघात झाला. अपघाताची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हुड्डा हे शहरातील आॅटो स्पेअर्सचे व्यावसायिक आहेत, तर लाखानी हे महात्मानगर येथील बेकर्स बाऊंटीचे संचालक होते. लाखानी दांपत्याच्या मृतदेहांचा दफनविधी दुपारी ४ वाजता, तर हुड्डा कुटुंबातील मृतांचा रात्री ८ वाजता देवळालीगाव येथील खोजा कब्रस्तानात होणार आहे.