Nashik: अंबड औद्योगिक वसाहतीत भंगार गुदामाना आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 11:58 AM2023-10-04T11:58:50+5:302023-10-04T11:59:18+5:30

Nashik News: अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगर या भागात असलेल्या पाच ते सहा भंगार गोडाऊनला बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत भंगार मध्ये गोळा केलेले पुष्टे, प्लास्टिक आदी साहित्य जळून खाक झाले.

Nashik: Fire breaks out in a scrap warehouse in Ambad Industrial Estate | Nashik: अंबड औद्योगिक वसाहतीत भंगार गुदामाना आग

Nashik: अंबड औद्योगिक वसाहतीत भंगार गुदामाना आग

googlenewsNext

- नरेंद्र दण्डगव्हाळ
नाशिक - अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगर या भागात असलेल्या पाच ते सहा भंगार गोडाऊनला बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत भंगार मध्ये गोळा केलेले पुष्टे, प्लास्टिक आदी साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नाशिक शहरातील मुख्यालयासह सिडको, सातपूर, पंचवटी ,नाशिक रोड या भागातील बंबाच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगर या भागात भाडेतत्त्वावर असलेल्या पाच ते सहा भंगार गोदामाला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत भंगार मधील गोळा केलेले पुठ्ठे, प्लॅस्टिक यासह लाखो रुपये किमतीचे भंगाराचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही..अंबड औद्योगिक वसाहतीत दत्तनगर दातीर मळा परिसरात पहाटेच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच मुख्यालयासह सिडको, सातपूर,  नाशिक रोड, अंबड औद्योगिक वसाहतीततील  अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी अंबड पोलिस ठाणे, सातपूर पोलिस ठाणे व औद्योगिक वसाहत चुंचाळे पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.

Web Title: Nashik: Fire breaks out in a scrap warehouse in Ambad Industrial Estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.