शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक @ ३८ : नाशिकचा पारा चढता

By admin | Updated: March 23, 2017 18:35 IST

गुरूवारी (दि.२३) शहराचे कमाल तपमान ३८.१ अंश इतके नोंदविले गेले.

नाशिक : नाशिकचा तपमानाचा पारा चढता असून गुरूवारी (दि.२३) शहराचे कमाल तपमान ३८.१ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच बुधवारपासून शहराच्या तपमानात वाढ होऊ लागल्याने वातावरण अतिउष्ण होऊन नागरिकांच्या जीवांची लाहीलाही होत आहे.बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. वाढत्या उष्म्यामुळे ताप येण्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकेकाळी आरोग्यवर्धक हवामानासाठी नाशिक शहर ओळखले जात होते म्हणूनच अन्य शहरांमधून लोक हवा पालट करण्यासाठी नाशिकला पसंती देत होते; मात्र काळानुरूप शहराच्या हवामानाचे आरोग्य ढासळत असून नाशिकलाही उष्म्याचा वाढता त्रास मार्चअखेर नागरिकांना सहन करावा लागत आहे. ३मे २००२ साली नाशिकच्या कमाल तपमानाचा पारा सर्वाधिक ४३.९ अंश इतका नोंदविला गेला होता. हा उच्चांक राहिला असून पंधरा वर्षांमध्ये नाशिकरांनी कधीही एवढा प्रखर उन्हाळा अनुभवला नाही; मात्र यावर्षी मार्चमहिन्याचे सात दिवस शिल्लक असून पारा ३८ अंशापर्यंत पोहचल्याने उन्हाच्या तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. गेल्या वर्षीही मार्च महिन्यात कमाल तपमानाचा पारा ३७ अंशाच्या आसापास स्थिरावला आहे; मात्र त्यावेळी हवेचा वेग अधिक असल्याने शहरात उष्मा कमी जाणवत होता. यावर्षी हवेचा वेग कमी झाला असून तपमानाचा पारा चढता असल्याने उन्हाच्या झळा अधिक प्रखर वाटू लागल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सध्या दिवस आणि रात्र हे प्रत्येकी बारा तासांचे आहे.येत्या सात दिवसांत हवेचा वेग न वाढल्यास आणि ढगाळ हवामान राहिल्यास पारा अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरूवारी सकाळी आकाशात ढग जमा झाल्याने तपमानात वाढ झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.