शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या नंदिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 18:39 IST

या घटनेत वीजप्रवाहाशी संपर्क आल्याने नंदिणी सुमारे ५२ टक्के भाजली होती तर तीचा भाऊ शुभमदेखील (१९) जखमी झाला.

ठळक मुद्देकेदार कुटुंबीयांनी तीघा सदस्यांना गमावल्याने परिसरात हळहळ उपचारादरम्यान तीचा रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृत्यू

नाशिक : नाशिक : सिडको येथील उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात २९ सप्टेंबर २०१९ रोजी घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाकताना गच्चीपासून काही फूटांवर असलेल्या वीजतारांच्या विद्युतप्रवाहचा झटका लागून सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला होता. तसेच या घटनेत गंभीरपणे जखमी झालेली नंदिनी शांताराम केदार उर्फ राणी (२३)हीचा उपचारादरम्यान रूग्णालयात रविवारी (दि.१७) मृत्यू झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवपुरी चौकात केदार कुटुंब वास्तव्यास असून या कुटुंबाची सून सिंधुबाई केदार (४०) गच्चीवर कपडे वाळत टाकत होत्या. त्यावेळी त्यांची सासू सोजाबाई (७५) या जवळच एका पलंगावर बसलेल्या होत्या. अचानकपणे सिंधुबाई यांना गच्चीजवळून जाणाऱ्या वीजवाहिन्यांच्या वीजप्रवाहचा झटका बसल्याने त्या जागीच कोसळल्या. त्यामुळे त्यांची सासू सोजाबाई यांनी सूनेच्या मदतीसाठी धाव घेतली मात्र त्यांनाही वीजप्रवाहचा धक्का बसल्याने दोघींचा दुर्दैवी मृत्यू २९ सप्टेंबर रोजी झाला होता. या घटनेत वीजप्रवाहाशी संपर्क आल्याने नंदिणी सुमारे ५२ टक्के भाजली होती तर तीचा भाऊ शुभमदेखील (१९) जखमी झाला. आडगावच्या पवार वैद्यकिय महाविद्यालयात नंदिनीवर उपचार सुरू होते. तेथून पुन्हा काही दिवसांपुर्वीच नंदिनीला जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तीचा रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. या दुर्दैवी घटनेत केदार कुटुंबीयांनी तीघा सदस्यांना गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शांताराम केदार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून आई, पत्नी गमावल्याच्या धक्क्यातून सावरण्याचा ते प्रयत्न करत असताना मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातmahavitaranमहावितरण