छावणी परिषदेचा थेट नियुक्तीसाठी मागविली नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST2021-03-06T04:14:49+5:302021-03-06T04:14:49+5:30

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या ३ मार्चच्या आदेशानुसार देशभरातील सर्व कमांड कार्यालयांना या बाबत पत्र पाठवून ८ फेब्रुवारी रोजी नियुक्ती करण्यात ...

Names invited for direct appointment of the Camp Council | छावणी परिषदेचा थेट नियुक्तीसाठी मागविली नावे

छावणी परिषदेचा थेट नियुक्तीसाठी मागविली नावे

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या ३ मार्चच्या आदेशानुसार देशभरातील सर्व कमांड कार्यालयांना या बाबत पत्र पाठवून ८ फेब्रुवारी रोजी नियुक्ती करण्यात आलेल्या व्यरिड बोर्डावर ब्रिगेडीयर व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह केंद्र सरकारच्या वतीने या बोर्डावर नेमण्यात येणाऱ्या व्यक्तींचे येत्या १९ मार्च पर्यंत नाव पाठविण्यात यावे अशा सुचना केल्या आहेत. मात्र सदर व्यक्ती सरकारी कर्मचारी असता कामा नये अशी अट घालण्यात आली आहे. या पत्रानुसार तीन नावाची शिफारस करावयाची आहे. या बोर्डावर जाण्यासाठी माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे,तानाजी करंजकर, कावेरी कासार, चंद्रकांत गोडसे, तानाजी भोर, अनिता गोडसे, संजय गोडसे, भगवान कटारिया आदी इच्छूक असून, यातील कोणाची नावे अंतिम यादीत जातात याबाबत देवळालीत उत्सूकता निर्माण झाली आहे.

Web Title: Names invited for direct appointment of the Camp Council