शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नाईक शिक्षण संस्थेत ‘परिवर्तन’२९ पैकी २८ जागा पटकावल्या

By admin | Updated: July 23, 2014 00:25 IST

दिघोळे पराभूत; अध्यक्षपदी कोंडाजी आव्हाड

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत १५ वर्षांनंतर प्रथमच विद्यमान अध्यक्ष माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांना कोंडाजी आव्हाड यांच्याकडून ८३४ मतांनी पराभूत व्हावे लागले. कोंडाजी आव्हाड व हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने श्रीविजय पॅनलचा धुव्वा उडवित २९ पैकी २८ जागांवर विजय मिळविला. श्रीविजय पॅनलचे एकमेव विजयी उमेदवार नगरसेवक दामोदर मानकर यांनी अवघ्या एका मताने विनायक शेळके यांचा पराभव केला.
सोमवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी मंगळवारी सकाळी सात वाजता संपली. विश्वस्त पदासाठीच्या सहा जागांसाठी परिवर्तनच्या बाळासाहेब गामणे (३६२४), विठ्ठलराव पालवे (३४२१), बबनराव सानप (३२८९), (पान ७ वर)

अ‍ॅड. वाळीबा हाडपे (३२४१), डॉ. धर्माजी बोडके (३२४०) हे उमेदवार विजयी झाले, तर विनायक शेळके यांना श्रीविजयच्या दामोदर मानकर यांच्यापेक्षा (३०११) अवघे एक मत कमी पडल्याने पराभूत व्हावे लागले. नाशिक तालुका संचालक पदासाठी परिवर्तन पॅनलचे महेंद्र आव्हाड (३५५२), प्रकाश घुगे (३६३२), गोकुळ काकड (३६०५), माणिक सोनवणे (३४२४) यांनी श्रीविजयच्या चारही उमेदवारांना सहाशे ते नऊशे मतांनी पराभूत केले. निफाड तालुका संचालक पदासाठी परिवर्तन पॅनलचे उमेदवार बंडू नाना दराडे (३८२४), रामनाथ नागरे (३५३५), भगवान सानप (३५५०) यांनी श्रीविजयच्या उमेदवारांचा नऊशे ते बाराशे मतांनी पराभव केला. दिंडोरी संचालक पदासाठी परिवर्तन पॅनलचे कचरू आव्हाड (३७५६), शरद बोडके (३७१४) व यशवंत दरगोडे (३५३८) यांनी विजय मिळविला. येवला संचालक पदासाठी महेश आव्हाड (३७१५) व संपत वाघ (३५४२) यांनी विजय मिळविला. सिन्नर संचालक पदासाठी बाळासाहेब चकोर (३७५७), हेमंत नाईक (३६५२), सुदाम नवाळे (३३७१) यांनी, तर महिला राखीव गटातून कविता शिवाजी मानकर (३७३५) व शैलेजा अशोक बुरकूल (३४६७) यांनी विजय मिळविला. सहचिटणीस पदासाठी अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी सर्वाधिक ४३४३ मते मिळवून गोविंद साबळे यांचा २२११ मतांनी पराभव केला. सरचिटणीस पदासाठी परिवर्तनचे हेमंत धात्रक यांनी ४१०० मते मिळवित अ‍ॅड. पी. आर. गिते यांचा १८७५ मतांनी परावभ केला. उपाध्यक्ष पदासाठी परिवर्तनच्या प्रभाकर धात्रक यांनी ३५४८ मते घेत अ‍ॅड. विलास आंधळे यांचा ५३० मतांनी पराभव केला, तर सर्वाधिक चुरशीची अध्यक्षपदाची लढत होईल अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात कोंडाजी आव्हाड यांनी ३६३५ मते घेत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांना ८३४ मतांनी पराभूत केले. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास संपली. मात्र सोमवारी मध्यरात्रीच विजयाचा कौल पाहता परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र, परिवर्तन पॅनलच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना हार-तुरे आणण्यास व गुलाल उधळण्यास मनाई करीत हा विजय स्व. गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली म्हणून घोषित केला. यावेळी परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार कोंडाजी आव्हाड, हेमंत धात्रक, माणिक सोनवणे, महेश आव्हाड, महेंद्र आव्हाड, बाळासाहेब गामणे, कविता शिवाजी मानकर यांच्यासह सर्वच उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इन्फो..
एक मताचा घोळ
विश्वस्तपदासाठी परिवर्तन पॅनलचे पाचही उमेदवार विजयाकडे आगेकूच करीत असताना विनायक शेळके व श्रीविजय पॅनलचे दामोदर मानकर यांच्यात सातव्या फेरीनंतर रस्सीखेच सुरू झाली. निकालाच्या सर्वात शेवटी दामोदर मानकर यांना ३०११, तर विनायक शेळके यांना ३०१० मते पडल्याने मानकर यांना निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी विजयी घोषित करताच परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी त्यास तीव्र हरकत घेत दुबार मतमोजणीची मागणी केली. मात्र ताडगे यांनी ती फेटाळली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सप्तशृंगीचे घेतले दर्शन
परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांनी मंगळवारी (दि.२२) दुपारी वणी येथे जाऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन केले. त्यानंतर बुधवारी (दि.२३) हे सर्व विजयी उमेदवार पदभार स्वीकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी निकालानंतर बहुतांश संचालकांनी दिवसभर आराम घेणे पसंत केले.