कादवा डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:59 PM2020-09-30T23:59:33+5:302020-10-01T01:07:29+5:30

दिंडोरी : देशांतर्गत अतिरिक्त साखर निर्मिती होत असल्याने साखरेला भाव व उठाव नाही अशा परिस्थितीत केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे अवघड आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती ही करावीच लागणार असून त्यादृष्टीने कादवाने सर्व तयारी केली आहे. लवकरच डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केली.

The mud distillery will set up an ethanol project | कादवा डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्प उभारणार

कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगामासाठी बॉयलर प्रदीपन करताना श्रीराम शेटे, गणपत पाटील, विठ्ठल संधान, बाळासाहेब आथरे ,अशोक भालेराव आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देबॉयलर अग्निप्रदीपन समारंभ : चेअरमन श्रीराम शेटे यांची घोषणा

दिंडोरी : देशांतर्गत अतिरिक्त साखर निर्मिती होत असल्याने साखरेला भाव व उठाव नाही अशा परिस्थितीत केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे अवघड आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती ही करावीच लागणार असून त्यादृष्टीने कादवाने सर्व तयारी केली आहे. लवकरच डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केली.
कादवा सहकारी साखर कारखान्याचे 44 व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ चेअरमन श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी ते बोलत होते. अग्निप्रदीपन पूजा विठ्ठल संधान, बाळासाहेब आथरे व अशोक भालेराव यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हा बँक संचालक गणपत पाटील, माजी संचालक संजय पडोळ, नरेश देशमुख, युनियन अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे आदींची भाषणे झाले. स्वागत प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनीं केले. प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले. तर आभार संचालक बाळासाहेब जाधव यांनी मानले. यावेळी व्हा.चेअरमन उत्तमबाबा भालेराव, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, संचालक मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बापू पडोळ, दिनकर जाधव, सुनील केदार, विश्वनाथ देशमुख, शिवाजी बस्ते, सुकदेव जाधव, सुभाष शिंदे, संदीप शार्दूल,चंद्रकला घडवजे, शांताबाई पिंगळ, साहेबराव पाटील, संपत कोंड, शेखर देशमुख, बबन देशमुख, विलास वाळके, उपसभापती अनिल देशमुख,जिप सदस्य भास्कर भगरे,प्रकाश पिंगळ,बाकेराव पाटील आदींसह अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकल्पासाठी ठेवी देण्याचे आवाहन
कादवाने डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याची पूर्ण तयारी केली आहे त्याचे उभारणीसाठी आवश्यक कर्ज मिळविण्यासाठी काही रक्कम निधी उभारावा लागणार असून त्यासाठी सभासद व शेतकर्यांनी कारखान्याकडे प्रत्येकी पाच हजार रुपये ठेव ठेवावी, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले.

 

 

Web Title: The mud distillery will set up an ethanol project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.