शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

हालचाली मंदच; विधानसभेचा परिणाम

By admin | Updated: September 30, 2014 23:08 IST

हालचाली मंदच; विधानसभेचा परिणाम

जिल्हा परिषद सभापती निवडणूकनाशिक : अवघ्या ७२ तासांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात शांतता दिसत असून, या निवडणुकीवर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे सावट आले आहे. सर्वच इच्छुक आपापल्या मतदारसंघात पक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरत असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतींची निवड येत्या शनिवारी (दि. ४) होत असून, निवडणुकीसाठीचे माहिती वजा सभेचा अजेंडा सर्वच सदस्यांना पोहोच झाला आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने कॉँग्रेसच्या गोटात कमालीचे नैराश्य आले असून, आता कोणतीही समिती घ्यायची नाही, तटस्थ राहायचे इतपत कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मानसिकता झाल्याचे, तर सर्व आयतेच चालत आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चैतन्याचे वातावरण आहे. सभापतिपदासाठी इच्छुकांचे लॉबिंगही सुरू झाले आहे. शिवसेना तटस्थ राहिल्यास आणि कॉँग्रेसची एकूण भूमिका पाहता राष्ट्रवादीलाच पुन्हा चारही विषय समिती सभापतिपदे मिळणार असल्याची चर्चा आहे, तर दुसऱ्या एका मतप्रवाहानुसार राष्ट्रवादीने शिवसेनेला किंवा भाजपा व माकपाला सोबत घेऊन दोन-दोेन समित्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून रवींद्र देवरे, शैलेश सूर्यवंशी, यतिन पगार, गोरख बोडके, बाळासाहेब गुंड, प्रवीण गायकवाड, इंदुमती खोसकर, संगीता ढगे, उषा बच्छाव आदि इच्छुक आहेत, तर शिवसेनेकडून प्रवीण जाधव, बंडू गांगुर्डे, भाजपाकडून केदा अहेर इच्छुक आहेत. शिवसेना आणि कॉँग्रेसची काय भूमिका राहते यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष असून, खऱ्या घडामोडी शुक्रवारी (दि. ३) दसऱ्याच्या दिवशीच होणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)वीजपंप नादुरूस्तीमुळेपाणीपुरवठ्यावर परिणामयेवला : पिंपळखुटे तिसरे ग्रामपंचायतीचा विद्युतपंप नादुरूस्त असून, गावाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ग्रामस्थांनी तातडीने वीजपंपाची दुरूस्ती करून नागरिकांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)पन्हाळसाठे -पिंपळखुटे तिसरे ग्रुपग्रामपंचायतीची पाणी पुरवठा योजनेचावीजपंप ८ महिन्यांपासून बंद आहे. विहिरीत पुरेसा पाणीसाठा असूनही वीजपंपनादुरुस्त असल्याने गावाला पाणीपुरवठा करता येत नाही.सरपंच व ग्रामसेवकयांचेकडे वारवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप उपसरपंचराधाबाई बोडके यांचे सह सदस्य व ग्रामस्थांनी केला आहे. या वीजपंपदुरु स्ती साठी केवळ ७५० रु पये दुरु स्ती खर्च व २०० फुट वायरची गरज आहे.