शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन : सीईओंच्या दणक्यानंतर बैठकीला हजेरी

By admin | Updated: September 30, 2014 22:46 IST

मारहाणीच्या निषेधार्थ वैद्यकीय संघटनेचे धरणे

नाशिक : मालेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला त्याच्या घरी जाऊन केंद्रातील एका शिपायाच्या मुलाने मारहाण केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ३०) जिल्हा परिषदेच्या मासिक बैठकीवर काही वेळ राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला.दरम्यान, या घटनेची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना मिळताच त्यांनी घटना चार दिवसांपूर्वीची असून, या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आहे. आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांशी याबाबत बोललो आहोत. तरीही वैद्यकीय अधिकारी त्यांच्या निर्णयावर ठाम राहणार असतील तर त्यांची एक दिवसाची विनावेतन करण्यात येईल, असा इशारा दिल्यानंतर सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुखदेव बनकर यांच्या उपस्थितीतील बैठकीला हजेरी लावली.सौंदाणे येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब खोत यांनी याच आरोग्य केंद्रातील परिचर पारखे नामक व्यक्तीला काही काम सांगितले. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. त्यानंतर पारखे यांनी चिरंजीवाला घेऊन जाऊन डॉ. खोत यांना मारहाण केली. त्याच दिवशी सुखदेव बनकर यांनी डॉ. खोत यांच्याशी बोलून त्यांना पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांत गुन्हाही दाखल झाला. मंगळवारी जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक होती. त्यात ही बाब डॉ. खोत यांनी सांगताच राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ या बैठकीवर बहिष्कार टाकत मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या दिला. राज्य नर्सेस संघटनेच्या वतीने या मारहाणीच्या निषेधार्थ संघटनेने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शोभा खैरनार यांनी दिली. त्यानंतर संघटनेचे शिष्टमंडळ आरोग्य उपसंचालकांना भेटून आले. यावेळी डॉ. प्रदीप जायभावे, डॉ. दिलीप सूर्यवंशी, डॉ. संजय पवार, डॉ. अरविंद माहुलकर आदि उपस्थित होते.