शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

खर्डे गावात डास प्रतिबंधात्मक धुरळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:14 IST

खर्डे : देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात चिकनगुनिया आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचे वृत्त मंगळवारी (दि. २७) ...

खर्डे : देवळा तालुक्यातील ग्रामीण भागात चिकनगुनिया आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचे वृत्त मंगळवारी (दि. २७) रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच खर्डे, ता. देवळा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सकाळी संपूर्ण गावात डास प्रतिबंधात्मक धुरळणी करण्यात आली. डेंग्यू व चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण खर्डे व परिसरात आढळून येत असून, उपचारासाठी येथील दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने याची दखल घ्यावी, या आशयाचे वृत्त (दि. २७) रोजी प्रसिद्ध होताच देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांनी दखल घेऊन संबंधित ग्रामसेवकांना प्रतिबंधात्मक धुरळणी करण्याच्या सूचना करून सतर्क राहण्याचे सूचित करण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना डेंग्यू व चिकनगुनिया रोखण्यासाठी आरोग्य तपासणी व जनजागृती करण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यात चिकनगुनिया, डेंग्यूसारख्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर थैमान घातले असून, ग्रामीण भागातील सर्वच दवाखाने या आजाराच्या रुग्णांनी भरलेले दिसून येत आहेत. कोरोना महामारी आजार कुठेतरी आटोक्यात येत आहे. त्यातून जनता सावरत नाही तोच नवनवीन आजार उद्‌भवू लागल्याने नागरिकांच्या चिंतेत पुन्हा भर पडल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गावागावांत गाजर गवत वाढले असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

------------------

पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू व चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा फैलाव होतो. पंचायत समितीमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना प्रतिबंधात्मक धुरळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. डास उद्भव होणार नाही म्हूणन एक दिवस कोरडा पाळावा , वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

डॉ. सुभाष मांडगे, आरोग्य अधिकारी, देवळा पंचायत समिती

----------------------

खर्डे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावांत डास प्रतिबंधात्मक धुरळणी करताना कर्मचाऱ्यांसमवेत ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदी. (२७ खर्डे)

270721\27nsk_10_27072021_13.jpg

२७ खर्डे