शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: October 26, 2016 23:45 IST

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; सक्तमजुरीची शिक्षा

नाशिक : आई व भावासह रिक्षाने प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी आबिद अली सज्जाद गोवावाला (४०, रा़ स्रेहा पार्क, शिखरेवाडी, नाशिकरोड) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके -जोशी यांनी मंगळवारी (दि़२५) एक वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ १४ एप्रिल २०१४ रोजी अल्पवयीन मुलगी आपली आई व भावासह रिक्षाने नाशिकरोड ते आंबेडकरनगर असा प्रवास करीत होती़ या रिक्षामध्ये आरोपी आबिद गोवावाला हा पत्नीसह बसलेला होता़ या प्रवासादरम्यान आरोपीने मुलीचा विनयभंग केला. पहिल्या वेळेस मुलीने दुर्लक्ष केले मात्र त्याने पुन्हा दुसऱ्यांदा विनयभंग केल्याने मुलगी ओरडली व तिने रिक्षा थांबवत गोवावाला यास बेदम चोप देत उपनगर पोलिसांच्या हवाली केले होते़  या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी गोवावाला विरोधात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता़ या खटल्यात सरकारी वकील दीपशिखा भिडे- भांड यांनी चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची आई, भाऊ, रिक्षावाला व तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक साईप्रकाश चन्ना यांची साक्ष महत्त्वाची ठरली़ या गुन्ह्यात न्यायालयाने गोवावाला यास भादंवि कलम ३५४ (विनयभंग) अन्वये शिक्षा सुनावली़