अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By Admin | Updated: July 29, 2014 00:53 IST2014-07-29T00:39:32+5:302014-07-29T00:53:57+5:30

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Molestation of a minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या, तसेच दुचाकीवरून जात असताना तिला कट मारून अपघातास जबाबदार असलेल्या तरुणाविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ द्वारका परिसरातील अक्षय धनंजय पाटील हा एका अल्पवयीन मुलीला सतत चिडवत असे़ संबंधित मुलगी तिच्या बहिणीसह दुचाकीवर जात असताना पाटील याने पाठलाग करून त्यांच्या वाहनाला कट मारला़ यामध्ये दुचाकीवरून पडल्याने त्या दोघीही जखमी झाल्या़ याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फि र्यादीवरून संशयित अक्षय पाटीलवर विनयभंग, तसेच लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Molestation of a minor girl