शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

मनसेतील फूटप्रकरणी अहवाल ‘राज’दरबारी

By admin | Updated: April 11, 2015 00:07 IST

पश्चिम प्रभाग सभापती प्रकरण : माजी महापौरांच्या कृतीने पक्षात तर्कवितर्क

नाशिक : महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून मतदान करणारे माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, सुनीता मोटकरी आणि उमेदवारी करणाऱ्या माधुरी जाधव या मनसेच्या तिघा सदस्यांसंबंधीचा अहवाल पालिकेतील मनसेचे गटनेते अनिल मटाले यांनी शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांच्याकडे पाठविला आहे. दरम्यान, शनिवारी (दि.११) राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होत असून, त्यामध्ये नाशकात पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या माजी महापौरांसह तिघा सदस्यांसंबंधी ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गुरुवारी झालेल्या पश्चिम प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने आघाडीधर्म म्हणून कॉँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप आपल्या सदस्यांना बजाविला होता; परंतु ऐनवेळी राजकीय घडामोडी होऊन मनसेच्या बंडखोर उमेदवार माधुरी जाधव यांनी उमेदवारी करत माजी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ व सुनीता मोटकरी यांच्यासह सेना-भाजपा उमेदवारांच्या मदतीने सभापतिपद प्राप्त केले होते. निवडणुकीत चक्क माजी महापौर यतिन वाघ यांनी पक्षविरोधी भूमिका घेत सर्वांनाच अनपेक्षितपणे धक्का दिला. गुरुवारी घडलेल्या या राजकीय घडामोडीनंतर मनसेचे गटनेते अनिल मटाले यांनी संपूर्ण घटनेचा अहवाल शहर संपर्क अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांच्याकडे पाठविला आहे. याबाबत मटाले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, माजी महापौरांसह तिघा नगरसेवकांनी केलेली पक्षविरोधी कृती अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. माजी महापौरांना तर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महापालिकेचे सर्वोच्च पद बहाल केले. मनसेचा पहिला महापौर म्हणून त्यांचा नावलौकिक झाला; परंतु त्यांनी घेतलेली भूमिका अशोभनीय अशीच आहे. महापौरपद भूषविलेल्या माणसाला पक्षाचा व्हीप माहित असू नये, याबाबत मटाले यांनी आश्चर्य व्यक्त केले. वाघ यांना पक्षादेशाची माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, मनसेतील फुटीप्रकरणी पालिका वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले असून, मनसेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पक्षविरोधी कृतीबद्दल संताप व्यक्त केला आहे. वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सेना-भाजपला केलेली मदत हा मनसेच्या रणनीतीचा प्रकार आहे की काय, याबाबतही पालिकेच्या वर्तुळात चर्चा सुरू असलेली आढळून आली. (प्रतिनिधी)