शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
3
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
4
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
5
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
6
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
7
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
8
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
9
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
10
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
11
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
12
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
13
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
14
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
15
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
16
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
17
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
18
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
19
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
20
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा फसवणूक प्रकरणात द्विस्ट; तक्रार देणाऱ्या भूमी अभिलेख विभागानेच दिलेली ५ बिल्डरांना क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 20:59 IST

Mhada Land fraud: भूमी अभिलेख विभागाने शहरातील सुमारे दोनशे विकासकांवर फसवणुकीची तक्रार पोलिसांत केली, त्यातील पाच जणांचे दावे मान्य करत त्यांना परस्पर क्लीन चिटही दिली.

Nashik Mhada Land fraud: गरिबांसाठी म्हाडाला घरे किंवा जमीन न देता फसवणूक केल्याप्रकरणी ज्या भूमी अभिलेख विभागाने शहरातील सुमारे दोनशे विकासकांवर फसवणुकीची तक्रार पोलिसांत केली, त्यातील पाच जणांचे दावे मान्य करत त्यांना परस्पर क्लीन चिटही दिली आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांचा आणखी एक सावळागोंधळ उघड झाला आहे. विशेष म्हणजे या पत्राच्या आधारे गुन्हा रद्द करण्यासाठी काहींनी न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त आहे.

एक एकरपेक्षा कमी क्षेत्र करण्यासाठी ४९ विकासकांनी आकारफोड केली आणि नकाशे तयार केले, तसेच पोटहिस्सा बारा तयार करून हे दस्तावेज महसूल विभागाला सादर केले; परंतु हे नकाशे आणि सह्या मुळातच बोगस असल्याचे भूमी अभिलेख विभागाचे म्हणणे आहे. एक एकरपेक्षा कमी भूखंड व्हावेत यासाठी तुकडे करणाऱ्या या विकासकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, अनेकांची धावपळ सुरू आहे. 

यातील एकाला अटक झाली असून, उर्वरित सर्वच जण अटकपूर्व जामिनासाठी धावपळ करीत आहेत. मात्र, काही विकासकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारण आपले क्षेत्र मुळातच एक एकरपेक्षा कमी आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिटी सर्व्हे विभागाकडून मोजणी करून घेतल्याचा दावा केला आहे. 

अशातील पाच विकासकांनी भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केले आणि आपले क्षेत्र कमी असल्याचा दावा केला. विशेष म्हणजे, भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांनीच संबंधितांचे अर्ज बघून खुलाशानंतर त्यांचे अर्ज निकाली काढत असल्याचे नमूद केले आहे.

एकीकडे या ४९ विकासकांच्या आधारे त्यांचे भागीदार आणि जमीन मालक तसेच सर्व वाटेकरी अशा १९४ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर महसूलने जमिनीच्या मूळ मालकांसह सुमारे साडेतीनशे जणांना फेरफार रद्द करण्याच्या नोटिसा काढल्या आहेत. आणि आता भूमी अभिलेखने तपासणी आधीच काहींना क्लीन चिटही दिली.

गणेश गिते यांची तक्रार निकाली

भूमी अभिलेख उपअधीक्षकांनी ज्यांचे अर्ज निकाली काढले त्यात भाजपचे नेते गणेश गिते यांचा समावेश आहे. गंगापूररोडवरील सर्व्हे नंबर ७०/१ संदर्भात गिते यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल आहे. 

आता त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या हिस्सा ४ आणि १२ चे अवलोकन केले असता संबंधित सर्व्हे नंबरवर १ ते ५ हिस्से करण्यात आले असून, त्यात गणेश गिते यांचे नाव दिसत नाही. त्यामुळे त्यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे त्यांचा अर्ज निकाली काढण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे राजकीय दबावापोटी या प्रकरणात मुद्दामहून नाव टाकण्यात आल्याचा आरोप गिते यांनी केला आहे.

पोलिसांचा आक्षेप ?

एकीकडे तक्रारकर्ता भूमी अभिलेख विभागाने अचानक क्लीन चिट देण्याचा सपाटा सुरू केला असताना दुसरीकडे मात्र पोलिसांनी त्यास आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik MHADA land fraud: Land records gave clean chit after complaint.

Web Summary : Nashik land records, after filing a fraud complaint against developers regarding MHADA land, bizarrely issued clean chits to five builders. BJP leader Ganesh Gite received one. Police object to the clean chits issued.
टॅग्स :mhadaम्हाडा लॉटरीfraudधोकेबाजीNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस