सराईत गुन्हेगार जेरबंद

By Admin | Updated: January 9, 2017 00:39 IST2017-01-09T00:39:37+5:302017-01-09T00:39:50+5:30

नाशिक ग्रामीण : सात मोटारसायकली, १२ भ्रमणध्वनी संच ताब्यात

Martial soldier | सराईत गुन्हेगार जेरबंद

सराईत गुन्हेगार जेरबंद

नाशिक : मोटारसायकली व भ्रमणध्वनी संच चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, जिल्ह्यातील देवळा, दिंडोरी, सिन्नर आदि भागातून त्यांनी चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.
पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी ही कामगिरी केली. सदर आरोपींकडून सात मोटारसायकली व १२ मोबाइल संच असा एकूण दोन लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपी सुदाम पिंपळे याचा भाऊ फरारी आरोपी गोरख बाळू पिंपळे, रा. गुरेवाडी, सिन्नर, याच्याबाबत माहिती मिळाल्याने त्यास भगूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, घोटी येथील एका गुन्ह्यात त्याला ताब्यात देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Martial soldier