शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे येथे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 15:16 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटेसह परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थ, प्रशासन व व्यापारी यांनी सात दिवस जनता कर्फ्यु लागु करण्यात आला होता. जनता कर्फ्युस सर्वांनी प्रतिसाद दिल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास काही प्रमाणात यश आल्याने सोमवार (दि.५) पासून येथील बाजारपेठ पूर्वपदावर आल्याने व्यवहार सुरळीत सुरू झाले आहे.

ठळक मुद्देव्यवहार सुरळीत सुरू झाले आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटेसह परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थ, प्रशासन व व्यापारी यांनी सात दिवस जनता कर्फ्यु लागु करण्यात आला होता. जनता कर्फ्युस सर्वांनी प्रतिसाद दिल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास काही प्रमाणात यश आल्याने सोमवार (दि.५) पासून येथील बाजारपेठ पूर्वपदावर आल्याने व्यवहार सुरळीत सुरू झाले आहे.सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने खरेदी विक्र ीसाठी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी होत असते. तसेच आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तसेच सप्टेंबर महिन्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव येथे मोठ्या प्रमाणात वाढला होता. जवळपास एका महिन्यात ५० ते ६० रु ग्ण कोरोना बाधित आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली होती. त्यामुळे गावात जनता कर्फ्यु लागू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानतंर ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ व व्यापारी यांच्यात बैठक होवून सर्वानुमते सात दिवस जनता कर्फ्युबाबत निर्णय घेण्यात आला. सोमवार दि २८ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. सर्वांनी कडकडीत बंद पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रतिसाद दिला.सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा चार दिवसाचा व शेवटच्या आठवड्यात सात दिवसाचा असा ११ दिवस बंद पाळण्यात आला होता. नेहमीच होणाऱ्या बंदमुळे छोटे-मोठे दुकानदार व व्यावसायिक हतबल झाले होते. परंतु त्यांनाही बंदला प्रतिसाद देत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत केली आहे. जनता कर्फ्युनतंर सोमवारी (दि. ५) पुन्हा बाजारपेठ सुरू झाली असून सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहे.सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजारात कांदा विक्र ीचे व्यवहार सुरु करण्यात आले आहे. तसेच अनलॉक ५ मध्ये हॉटेल व रेस्टॉरंट सुरु झाले आहे. प्रत्येक व्यावसायिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर तसेच ग्राहकांमध्ये अंतर ठेवून व्यवहार केले पाहिजे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य