मुक्ती महिला मंडळाचा मंगळागौर कार्यक्रम

By Admin | Updated: September 6, 2016 01:23 IST2016-09-06T01:23:29+5:302016-09-06T01:23:41+5:30

मुक्ती महिला मंडळाचा मंगळागौर कार्यक्रम

Mangalagor Program of Mukti Mahila Mandal | मुक्ती महिला मंडळाचा मंगळागौर कार्यक्रम

मुक्ती महिला मंडळाचा मंगळागौर कार्यक्रम

सातपूर : येथील मुक्ती महिला मंडळाच्या वतीने ‘चला खेळूया’ मंगळागौर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सातपूर येथील सौभाग्य लॉन्समध्ये मुक्ती महिला मंडळाच्या वतीने आयोजित ‘चला खेळूया’ मंगळागौर या कार्यक्रमात सातपूर कॉलनी, समतानगर, अशोकनगर, श्रमिकनगर, परिसरातील जवळपास ४५० महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे उद््घाटन आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, फरिदा सलीम शेख, डॉ. शीतल पवार, डॉ. योगीता बागुल आदि उपस्थित होते. मंडळाच्या महिलांनी मंगळागौरीचे नृत्य सादर केले. प्रास्ताविक शशिकला पाटील यांनी केले. स्वागत अध्यक्ष योगीता भदाणे यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा काकुस्ते यांनी केले. यावेळी पूनम भारद्वाज, रेखा शर्मा, मनीषा गवळी, रंजिता महाडिक, अलका गायकवाड, सुनंदा सोनवणे, अलका तरटे, इंदुमती भामरे, रंजना गुंजाळ, आशा शिंदे आदिंसह मंडळाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)

Web Title: Mangalagor Program of Mukti Mahila Mandal