शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी शिवसेनेचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 00:25 IST

Maharashtra Assembly Election 2019 मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांत विजयाचा आत्मविश्वास असल्याने दोन दिवसांपासूनच शिवसेना संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची जय्यत तयारी करण्यात आली होती.

मालेगाव : मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांत विजयाचा आत्मविश्वास असल्याने दोन दिवसांपासूनच शिवसेना संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची जय्यत तयारी करण्यात आली होती.दादा भुसे यांनी विजयी चौकार मारताच समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. जल्लोष साजरा करतानाच विजयी उमेदवार दादा भुसे यांनी केलेले संयमित भाषण आणि तालुकावासीयांना दिलेला विकासाचा शब्द हा मतदारांच्या अपेक्षा वाढवून गेला.एकहाती विजय मिळेल अशी अपेक्षा असताना केवळ महिनाभरात मैदानात उतरलेल्या प्रतिस्पर्धी कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. तुषार शेवाळे यांना झालेले मतदानही दुर्लक्षित करून चालणार नाही. डॉ. शेवाळे यांनी तुल्यबळ लढत दिल्याने निवडणुकीत रंग भरला. शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाबाहेर बुधवारी दिवसभर पाऊस सुरू असतानाही व्यासपीठ उभारण्यापासून कार्यकर्त्यांसाठी करण्यात येणारी आसनव्यवस्था लक्ष वेधून घेत होती.तालुकाभरातून आलेले समर्थक आणि शिवसेना-भाजप पदाधिकारी तसेच भेटायला येणाऱ्या हितचिंतकांसाठी चहा, पाणी आणि नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. समर्थक कार्यकर्त्यांच्या विजयी मेळाव्यात व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांसमोर जमिनीवर बसलेल्या दादा भुसे यांनी आपण चौथ्या विजयानंतरही आकाशात नसून आपले पाय जमिनीवरच असल्याचे सांगत सर्व पदाधिकाºयांना बरोबर घेऊन शहर- तालुक्याच्या विकासासाठी झोकून देऊ, असे आश्वासन दिले.याचवेळी भुसे यांनी ग्रामविकास राज्यमंंत्रिपदावर काम करीत असताना केलेली कामे आणि मालेगाव जिल्हानिर्मितीसह अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देऊ, असे सांगितले.एकंदरीत राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्याने शहरासह तालुक्यातील विकासकामांना गती देण्यात यश येईल. दरम्यान, शहरासह तालुक्यातून शिवसेनेचा चौकार ठोकून विजय मिळविलेल्या दादा भुसे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा संपूर्ण तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.कॅम्प रस्त्याला आले यात्रेचे स्वरूपमालेगाव : मालेगाव मध्य आणि बाह्य मतदारसंघातील उमेदवारांची मतमोजणी सुरू असल्याने कॅम्प रस्त्यावर सर्वच पक्षांच्या समर्थकांनी गर्दी केल्याने यात्रेचे स्वरूप आले होते. भगवे आणि हिरवे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी कॅम्प रस्त्यावर एकच गर्दी केल्याने पोलिसांना वाहतुकीचे नियोजन करताना सर्कस करावी लागली. मालेगाव कॅम्प रस्त्यावरील रस्ते अडविण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांनी आपली वाहने इतर मार्गाने वळविण्यात आली होती. त्यामुळे छावणी पोलीस ठाण्यापासून न्यायालय आवारापर्यंत दुचाकी लावण्यात आल्या होत्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019malegaon-outer-acमालेगाव बाह्यResult Day Assembly Electionनिकाल दिवस विधानसभा निवडणूक