मालेगावचे पोलीस निरीक्षक बडगुजर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:23 IST2017-08-07T01:22:55+5:302017-08-07T01:23:06+5:30

बेशिस्त, निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल दिगंबर बडगुजर यांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी निलंबित केले आहे़

Malegaon Police Inspector Badgujar suspended | मालेगावचे पोलीस निरीक्षक बडगुजर निलंबित

मालेगावचे पोलीस निरीक्षक बडगुजर निलंबित

नाशिक : बेशिस्त, निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल दिगंबर बडगुजर यांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी निलंबित केले आहे़ मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी असताना अनेक गुन्ह्यांच्या तपासात बेशिस्तपणा केल्याचा ठपका बडगुजर यांच्यावर ठेवण्यात आला आहे़ पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्याकडे २०१६ मध्ये मालेगाव तालुका पोलीस ठाण्याची जबाबदारी होती़ या कालावधीतील गुन्ह्यातील स्त्री अत्याचाराचा तपास पोलीस उपनिरीक्षकाकडे देण्याऐवजी सहायक उपनिरीक्षक व नंतर पोलीस नाईक यांच्याकडे देऊन निष्काळजीपणा केला़ याबाबत बडगुजर यांच्याकडे कारणमीमांसेची विचारणा केली असता ती समाधानकारक नसल्याचेही चौकशीत समोर आले़

Web Title: Malegaon Police Inspector Badgujar suspended