शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव : ११ जागांवर शासनाचा ताबा

By admin | Updated: January 9, 2015 00:16 IST

शहराच्या सौंदर्यात पडणार भर

शफीक शेख : मालेगावमालेगाव महापालिकेला शासनातर्फे आरक्षित असलेले ११ भूखंड राज्य शासनाने शहर विकासासाठी दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुरुवारी शासकीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यात सदर ११ जागांचा ताबा घेण्यात आला. या जागांवर शाळा, मैदान, बेघरांसाठी घरे बांधणे, पार्किंग, स्विमिंग पूल, दुकाने, दवाखाना, बगिचा करण्यासाठी त्यांचा महापालिकेला उपयोग होणार आहे. परिणामी मालेगावच्या सौंदर्यात भर पडणार असून, शहरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन या जागांची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यानुसार शहरातील ११ जागा महापालिकेला मिळाल्या असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मनपा नगररचना विभागाने फौजफाट्यासह सदर जागांचा ताबा घेतला. आरक्षण क्रमांक ३१ नुसार सिटी सर्व्हे नं. १०९४ ही कॅम्पातील स्वातंत्र्यसैनिक नगरालगतची ०.४३० हेक्टर गावठाण जागेचा ताबा मनपाला मिळाला. यात प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. आरक्षण क्रमांक ३२ ही कॅम्पातील सिटी सर्व्हे नं. १०९४ स्वातंत्र्यसैनिक नगरालगतची गावठाण जागेचा ताबा मनपाने आज घेतला. त्यावर बेघरांसाठी घरे बांधण्यात येणार आहे. आरक्षण क्रमांक ३३ ही कॅम्पातील सिटी सर्व्हे क्रमांक १०३१ कॅम्पातील जागा खेळाच्या मैदानासाठी तर आरक्षण क्रमांक ३४ सिटी सर्व्हे नं. १५३४ ही जागादेखील खेळाच्या मैदानासाठी महापालिकेला मिळाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज ताबा घेण्यात आला.आरक्षण क्रमांक ४३/४४ ही सिटी सर्व्हे नं. १०७७ ही कॅम्पातील जागा पार्किंग तसेच दुकान केंद्रासाठी महापालिकेला मिळाली. आरक्षण क्रमांक ५१ नुसार सिटी सर्व्हे नं. ७२७ ही कॅम्पातील जागा बगिचासाठी महापालिकेला शासनाकडून देण्यात आली. आरक्षण क्रमांक ७४ सिटी सर्व्हे नं. ४८ ही कॅम्पातील जागा स्विमिंग पूल व बागांसाठी मिळाली असून, त्याचा ताबाही मनपाने घेतला. ४विकास आराखड्यात राखीव असलेल्या शासकीय मालकीची जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. शासनाकडून या जागांची मंजुरी मिळाली. त्यानुसार सदर जागांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून महापालिकेला हस्तांतरण करण्यात आले. यात आरक्षण क्रमांक ११ नुसार कॅम्पातील नदीपात्रालगतची सिटी सर्व्हे नं. १०९४ ही १.४६ हेक्टर जागेचा ताबा महापालिकेला मिळाला. या जागेवर खेळाचे मैदान विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय आरक्षण क्रमांक १२ नुसार सि. स. नं. १०९४च्या नदीपात्रालगत ०.१९० हेक्टर जागादेखील महापालिकेला देण्यात आली असून, त्यावर मैदान विकसित केली जाणार आहेत. याखेरीज आरक्षण क्रमांक ४१ ही सिटी सर्व्हे नं. १०७७ लगतची कॅम्पातील जागा दुकान केंद्र व अस्तित्वात दवाखाना यासाठी महापालिकेला देण्यात आली आहे.