शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जातीयवाद्यांचे ‘सर्जिकल स्ट्राइक’ करा

By admin | Updated: October 13, 2016 23:47 IST

मनमाड : जोगेंद्र कवाडे यांचे प्रतिपादन

मनमाड : भारताने पाकसीमेवरील अतिरेकाच्या सर्जिकल आॅपरेशन मोहिमेद्वारे ज्या पद्धतीने खात्मा केला त्याच पद्धतीने देशातील जातीयवाद करणाऱ्या संशयीताचा बंदोबस्त अशा पद्धतीच्या मोहिमेद्वारे करण्यात यावा, अशी अपेक्षा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी गुरूवारी मनमाड येथे भेट दिली़ यावेळी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरक्षणाबद्दल एक शब्द न बोलणाऱ्यांनी आता हा मुद्दा उपस्थित करून राजकारण चालवले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला़ सीमेवर जवानांनी दहशतवाद्यांविरोधात केलेले सर्जिकल स्ट्राइक आता जातीयवाद्यांविरोधात करण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केली़जे समाजकंटक अशा प्रकारे सामाजिक तेढ निर्माण करत आहेत त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. अनुसूचित जाती-जमातीच्या जनतेसाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा हे एक संरक्षण आहे. अनेक कायद्यांचा दुरूपयोग होत असताना ते कायदे रद्द करण्याची मागणी होत नाही. मात्र अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरूपयोग होत असल्याचे सांगत रद्द करण्याची मागणी करणे योग्य नसल्याचे मत कवाडे यांनी व्यक्त केले. सर्व समाजसमूहांनी एकमेकांच्या जिवावर न उठता एकमेकांच्या सुख-दु:खाचे साथीदार व्हा, असे आवाहन मुक्ती घोषणा दिनानिमित्त कवाडे यांनी केले. यावेळी पक्षाचे राज्य सरचिटणीस गणेश उन्हवणे, चरणदास इंगोेले, देवेंद्र आडसुळे, अशोक जगताप, सुनील साळवे, रवींद्र दाभाडे, रिजवान खान, अनिल संसारे, रवींद्र अहिरे, प्रदीप अहिरे, राज पवार उपस्थित होते. (वार्ताहर)