महावीर जयंती रॅलीत सामाजिक संदेशांवर भर

By Admin | Updated: April 8, 2017 17:06 IST2017-04-08T17:06:28+5:302017-04-08T17:06:28+5:30

महावीर जयंती रॅलीत सामाजिक संदेशांवर भर

Mahavir Jayanti rally emphasizes social messages | महावीर जयंती रॅलीत सामाजिक संदेशांवर भर

महावीर जयंती रॅलीत सामाजिक संदेशांवर भर

नाशिक : भगवान महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जैन सेवा संघ व जिओ यांच्या वतीने शहरातून शनिवारी (दि.८) काढण्यात आलेल्या रॅलीत ‘जगा आणि जगू द्या’, ‘अहिंसा’, ‘हेल्मेटचे महत्त्व’, ‘वाहतूक सुरक्षा’ आदि विषयांद्वारे जनजागृती करण्यात आली. रविवार कारंजावरील जैन स्थानकातून रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी जैन धर्मातील प्रमुख २४ तीर्थंकरांच्या प्रतिमा असलेल्या सुशोभित २४ चारचाकी व २४ दुचाकी वाहनांवर विविध सामाजिक संदेश देण्यात आले होते. रॅली रविवार कारंजा, अशोकस्तंभ, केटीएचएम कॉलेज, राका कॉलनी, कॉलेजरोड, महात्मानगर या मार्गे जाऊन विल्होळी येथील स्थानकात तिचा समारोप करण्यात आला.

Web Title: Mahavir Jayanti rally emphasizes social messages