शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला संत संस्कारांची गरज

By admin | Updated: April 9, 2015 00:15 IST

रामकृष्ण लहवितकर : एन. एम. आव्हाड अभीष्टचिंतन व पुस्तक प्रकाशन सोहळा

 नाशिक : वाढलेला भ्रष्टाचार व व्यभिचार रोखण्यासाठी देशाला विशेषत: महाराष्ट्राला संत संस्कारांची गरज आहे. त्यासाठी सकस संत साहित्याची निर्मिती ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी केले. सावरकरनगर येथील मते नर्सरी येथे ज्येष्ठ नेते एन. एम. आव्हाड यांचा अभीष्टचिंतन सोहळा व ‘चेतन चिंतामणीचा ठाव’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. लहवितकर म्हणाले की, त्याकाळी संत साहित्याच्या माध्यमातून समाजाला विचार दिला. नंतरच्या काळात यामध्ये खंड पडल्याने भ्रष्टाचार, व्यभिचार वाढला आहे. त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून संत साहित्याची निर्मिती व्हायला हवी. एन. एम. आव्हाड यांच्या पुस्तकात अध्यात्म आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घातली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यासपीठावर वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शांताराम बनकर आदि उपस्थित होते. दरम्यान, यावेळी एन. एम. आव्हाड यांचा सपत्निक अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार आदि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)