शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: महायुतीच्या प्रचारात सेनेचा हात आखडता; भाजप उमेदवार चिंतित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 01:02 IST

नाशिक शहरात एकूण चार मतदारसंघ असून, त्यापैकी देवळाली मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत, तर नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघ भाजपकडे आहेत.

नाशिक : भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी शहरातील मतदारसंघात शिवसेनेचा सहभाग जेमतेमच दिसत असून, त्यामुळे भाजप उमेदवार हवालदिल झाले आहेत. नाशिक पश्चिममध्ये तर शिवसेना बंडखोराचा प्रचार हा शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार, असा सुरू असून त्यामुळे युती होऊनही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.नाशिक शहरात एकूण चार मतदारसंघ असून, त्यापैकी देवळाली मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत, तर नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघ भाजपकडे आहेत. महापालिकेतील संख्याबळाच्या आधारे नाशिक पश्चिम मतदारसंघ तरी भाजपकडून शिवसेनेला हवा होता. त्यामुळे त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, परंतु वरिष्ठ नेत्यांनी जागावाटप करताच उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पश्चिममध्ये सर्व इच्छुक आणि नगरसेवकांनीदेखील एकत्र येऊन सेनेचा उमेदवार उभा करण्याचे ठरविले. त्यानंतर बंडखोरी करण्यात आली. आता बंडखोराचा प्रचार थेट शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार असा सुरू आहे, तर दुसरीकडे अन्य मतदारसंघातदेखील शिवसेनेचा हात अखडता आहे. युती होऊनदेखील शिवसेनेचा प्रतिसाद यथातथाच आहे. त्यातच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीकडून निवडून आलेले खासदार हेमंत गोडसे यांचा सहभाग नसून त्यामुळेदेखील भाजपात हा चर्चेचा विषय ठरला आहे.लोकसभेतही तोच अनुभवलोकसभा निवडणुकीत खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतरदेखील शिवसेनेच्या काही गटांची नाराजी होती. त्यावेळी भाजप कायकर्तेच कसून कामाला लागले होते. त्यानंतर विधानसभेत जागावाटपात अनेक जण इच्छुक होते, परंतु जागावाटप जाहीर झाले नाही आणि शिवसेनेचे उमेदवार नसल्याने कार्यकर्ते प्रचारात रस घेत नसल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक