महंत सुकेणेकरबाबा यांचे निधन

By Admin | Updated: March 30, 2017 01:10 IST2017-03-30T01:10:10+5:302017-03-30T01:10:23+5:30

कसबे सुकेणे : महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत तथा सुकेणेकर गादीचे महंत श्री सुकेणेकरबाबा (१०५) यांचे बुधवारी पहाटे मौजे सुकेणे दत्त मंदिरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.

Mahant Sukenakarababa passed away | महंत सुकेणेकरबाबा यांचे निधन

महंत सुकेणेकरबाबा यांचे निधन

कसबे सुकेणे : महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत तथा सुकेणेकर गादीचे महंत श्री सुकेणेकरबाबा (१०५) यांचे बुधवारी पहाटे मौजे सुकेणे दत्त मंदिरातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. महंत सुकेणेकरबाबा नावाने ते देशभरातील महानुभाव पंथात प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनामुळे महानुभाव पंथावर शोककळा पसरली आहे.  हरेश्वर नाना पाटील असे जन्मनाव असलेले आणि दीक्षेनंतर हरिराज बीडकर म्हणून परिचित, सुकेणेकर गादीचे महंत  सुकेणेकरबाबा यांचा जन्म ८ एप्रिल १९१२ रोजी भिवंडी येथे झाला. मौजे  सुकेणे दत्त मंदिरातील सुकेणेकर  संत परंपरेतील गादीची महंती त्यांच्याकडे होती. जोतिषशास्त्रावर त्यांचा गाढा अभ्यास होता.
महानुभावीय वाङ्मयात त्यांचा अभ्यास होता. लीला चरित्र, भगवतगीता या प्राचीन ग्रंथाचे त्यांनी सोप्या भाषेत विश्लेषण केले होते. नाशिकसह राज्यभरातील महानुभावपंथीय मंदिरे, आश्रम यांच्या उभारणीत व पंथीय साहीत्य प्रसार व प्रचारात त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यासह पंजाब, मुंबई, गुजरात त्यांचा मोठा शिष्य परीवार आहे. (वार्ताहर)
अनंतात विलीन
महंत सुकेणेकरबाबा यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महानुभाव पंथीय विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण करून महंत सुकेणेकरबाबा यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Web Title: Mahant Sukenakarababa passed away