शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चाळीत युरिया टाकल्याने लोहोणेरला गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 19:00 IST

लोहोणेर : येथील शेतकरी प्रवीण अहिरे व पोर्णिमा अहिरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९०८ मधील शेतातील कांदा चाळीत कोणीतरी रासायनिक युरिया टाकल्यामुळे सदरचे शेतकरी दापत्य हवालदिल झाले आहे . याप्रकरणी देवळा पोलिसात अज्ञात समाजकंटकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण अहिरे हे काल दीपक देशमुख या मित्रासोबत शेतात गेले असता कांदा चाळीकडे लक्ष गेल्यावर चाळीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक युरिया टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लोहोणेर येथील पोलीस पाटील अरु ण उशिरे यांना बोलावून घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पौर्णिमा अहिरे यांनी देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अहिरे यांचे वसाका रस्त्यालगत गट क्रमांक ९०८ मध्ये ५५ बाय ५५ आकाराचे मोठे पत्र्याचे शेड असून यात दोन पाखी कांद्याची चाळ आहे. या चाळीत सुमारे ७०० ते ८०० क्विंटल कांद्याची साठवणूक करण्यात आली आहे. आजच्या बाजारभावानुसार सुमारे नऊ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे.सदर प्रकरणाची कृषी विभागाने दखल घेऊन कृषी सहायक वैशाली पवार यांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणी देवळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खंडेराव रदवे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी