पुरात वाहून जाणाऱ्या वृद्धाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 22:34 IST2017-07-23T22:34:26+5:302017-07-23T22:34:26+5:30

पंचवटी ; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

Livelihood of an old man carrying a flood | पुरात वाहून जाणाऱ्या वृद्धाला जीवदान

पुरात वाहून जाणाऱ्या वृद्धाला जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय पुरात वाहत जाणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्धाला रविवारी (दि.२३) आला़ देवानंददास नामक वृद्ध गाडगे महाराज पुलाखालून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात वाहत चालले होते़ हा प्रकार पाहून पंचवटीतील आप्पा शिंदे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्या वृद्धाला पाण्यातून बाहेर काढून जीवदान दिले. या वृद्धावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी आप्पा शिंदे हे रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शिंदे मळा कमानीजवळ उभे होते़ त्यावेळी पुराच्या पाण्यात भगवे कपडे परिधान केलेला वृद्ध पाण्यात वाहत असल्याचे दिसून आले. त्यावेळी शिंदे यांनी पुराच्या पाण्यात उडी घेऊन बुडणाऱ्या वृद्धाला अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले. यानंतर १०८ अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे वृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी फोन केला, मात्र अ‍ॅम्ब्युलन्स वेळेत न आल्याने रिक्षाद्वारे या वृद्धास प्रथम डॉ़जाकीर हुसेन रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ वृद्धाची प्रकृती स्थिर असून, स्वत:चा जीव धोक्यात घालून सदर वृद्धाला वाचविणारे पंचवटीतील आप्पा शिंदे यांचे कौतुक केले जात आहे़

Web Title: Livelihood of an old man carrying a flood