शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची मादी अखेर जेरबंद

By admin | Updated: September 26, 2015 21:56 IST

शिंगवे : बछड्याच्या प्रेमापोटी मायेची शरणागती

निफाड : तालुक्यातील शिंगवे येथे बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वनविभागाच्या प्रयत्नांना शनिवारी (दि. २६) पहाटे यश आले. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याचा बछडा अडकल्याने त्याची माताही पिंजऱ्यात आल्याने वनविभागाला बछड्यासह बिबट्याची मादी जेरबंद करण्यात यश आले आहे. या बिबट्याच्या मादीने शिंगव्यासह गोदाकाठच्या गावांमध्ये दहशत निर्माण केली होती. येथील शेतकरी रामदास निवृत्ती रायते यांच्या शेतात वनविभागाने गुरुवारी (दि. २४) बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात बिबट्याचा बछडा अडकला. बछड्याने पिंजऱ्यात अडकताच डरकाळ्या फोडून परिसर दणाणून सोडला. त्यामुळे बछड्याची माता जवळच्याच उसातून बाहेर आली. मात्र बछड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी के लेली गर्दी पाहून मादी पुन्हा लपली. मादी पुन्हा येण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने याच पिजऱ्याला लागून दुसरा पिंजरा लावला. दुसऱ्या दिवशी या पिंजऱ्यावरील आवरण बाजूला सारल्याचे लक्षात आल्याने वनविभागाने दोन्ही पिंजऱ्यांची जागा हलवली. त्यामुळे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही मादी पुन्हा बछड्याच्या मायेपोटी येथे आल्याने पिंजऱ्यात अडकली. सकाळी सहाच्या सुमारास बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर या मादीला बछड्यासह गंगापूर नर्सरी येथे हलविण्यात आले. वर्षभरापासून वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गोदाकाठ परिसरात पिंजरे लावले होते. परंतु यात बिबटे अडकतच नव्हते. वर्षभरानंतर एक बछडा व त्याची माता या पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे. वनविभागाचे अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून परिसरात तळ ठोकून होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. (वार्ताहर)