शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अहिवंतवाडी परिसरात बिबट्याचे पुन्हा दर्शन

By admin | Updated: January 31, 2016 22:41 IST

अहिवंतवाडी परिसरात बिबट्याचे पुन्हा दर्शन

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी, मांदाणे, अंबानेर, जिरवाडे, चामदरी, गोलदरी परिसरात बिबट्याचा वाढता वावर पाहता वनविभाग अजून किती गुरे, शेळ्या व मनुष्यांच्या हाणीची वाट पाहात आहे, असा सवाल परिसरातून विचारला जात आहे.रविवारी दुपारच्या सुमारास बिबट्याने अंबानेर येथील रामदास पोपट महाले यांच्या गायीला भक्ष्य बनविण्यासाठी तिचा पाठलाग केला. परंतु परिसरातील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गायीचा जीव बचावला. बिबट्याने मांदाणे शिवारात धूम ठोकली. परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करूनसुद्धा वनविभाग मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.काही महिन्यांपूर्वी जुन्या पुनेगाव रस्तालगत असलेल्या सुधाकर एकनाथ कड या शेतकऱ्याचे संकरीत वासरू बिबट्याने फस्त केले होते व दोन गायींचा पाठलाग केला असता त्या गायी अंबानेर येथील विठ्ठल गायकवाड यांच्या विहिरीत पडल्याने गायींचा जीव वाचला. तेव्हासुद्धा वनविभागाने आम्ही पिंजरा लावला आहे. अशी उडवाउडवीची उत्तरे देत ज्या जंगलात हिंस्रप्राण्याचा वावर आहे, अशा ठिकाणी मनुष्याचा वावर वाढल्याने बिबट्यांचा हल्ल्यात वाढ झाल्याचे वनअधिकारी सांगत असल्याने सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे, असा सवाल परिसरातील ग्रामस्थकडून विचारला जात आहे.अस्वलीपाडाचे आदिवासी शेतकरी व अहिवंतवाडीचे उपसरपंच शिवाजी पोपट गावित यांच्या पांडाणे शिवारातील गट नंबर २२मध्ये पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्या होत्या. अधिकारी येतात, पंचनामा करतात. परंतु बिबट्याचा बंदोबस्त करत नाहीत. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर )